लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये मंगळागौर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये मंगळागौर
लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये मंगळागौर

लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये मंगळागौर

sakal_logo
By

52864
-------------------
लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये मंगळागौर
इचलकरंजी : शहरातील कलानगर येथील लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये अंगणवाडी बीट क्रमांक दोनतर्फे नागरी प्रकल्पअंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान मंगळागौर साजरी केली. रांगोळी व पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. तसेच अंगणवाडीतील मुलांची स्वस्थ बालक व स्वस्थ बालिका स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण केले. पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील व मुख्य सेविका मंजुळा वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. नगरसेवक प्रकाश पाटील, अमृत भोसले, नगरसेविका उमा गौड, सायली लायकर, मुख्याध्यापक संदीप पाटील उपस्थित होते. उज्ज्वला तोडकर यांनी आभार मानले.