हेरे सरंजाम प्रश्‍नी १० पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरे सरंजाम प्रश्‍नी १० पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
हेरे सरंजाम प्रश्‍नी १० पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

हेरे सरंजाम प्रश्‍नी १० पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

हेरे सरंजाम प्रश्‍नी १० पासून
बेमुदत आंदोलनाचा इशारा
चंदगड, ता. २७ ः हेरे सरंजाम अंतर्गत जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी पाच शेतकऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात १० ऑक्टोबर पासून येथील तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. ९ तारखेपर्यंत प्रशासनाने हा प्रश्‍न मार्गी न लावल्यास हे आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
इंग्रजकालीन हेरे (ता. चंदगड) संस्थान अंतर्गत ४७ गावातील जमिनी अ वर्ग करण्याबाबत अजूनही प्रश्न प्रलंबित आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासाठी खास नियोजन राबवले. परंतु अर्थकारण अंगी मुरलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्यामध्ये खोडा घातला. प्रशासनाकडून १९५२ पासून जमिन कसत असल्याबाबतचे पुरावे मागितले जात आहे. मात्र हे सर्व दस्तऐवज महसूलच्याच दप्तरात असल्याने शेतकऱ्यांना त्रास का असा प्रश्न करण्यात आला आहे. केवळ आर्थिक हिशोब गृहीत धरुन प्रशासनाकडून हा प्रपंच केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाला हा प्रश्न खरोखरच मार्गी लावायचा असेल तर त्यांनी आपल्याकडील पुराव्यांचा आधार घेऊन ९ ऑक्टोबर पर्यंत संबंधित शेती कुळांच्या नावे करावी अन्यथा १० तारखेपासून चंदगड येथील तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महादेव मंडलिक आमरोळी, धोंडीबा चिमणे वाळकुळी, अनिल रेगडे अडकूर, राजाराम वाईंगडे आमरोळी, राजेंद्र कापसे अडकूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.