
जयश्री जाधव फाऊंडेशनची स्थापना
53080
महिलांना स्वयंरोजगारातून
स्वाभिमानाकडे नेऊ
आमदार जयश्री जाधव; जाधव फाउंडेशनची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२७ : महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन कटिबद्ध आहे, असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी येथे व्यक्त केला.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी कैलासगडची स्वारी मंदिरात फाउंडेशनचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रेमला जाधव, उद्योजक सत्यजित जाधव, डॉ. दश्मिता जाधव उपस्थित होत्या.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘आज महिला सर्वच क्षेत्रांत कार्यरत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध उपक्रम राबवून महिला सशक्तीकरणावर भर देत आहे. वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. शहरातील सर्व महिलांनी फाउंडेशनचे सभासद व्हावे, असे आवाहन अध्यक्षा डॉ. जाधव यांनी केले.
नऊ दिवस शहरातील विविध भागांत फाउंडेशनच्या माध्यमातून कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन केले आहे. कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योजक जाधव यांनी केले. यावेळी सुनंदा जाधव, योगेश्वरी महाडिक, शारदा देवणे, श्वेता देवणे, मालिनी पोवार, सुनीता पाटील, विना परमार, सेजल सलगर, सरिता पवार आदी उपस्थित होत्या.
---