१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

हद्दवाढीच्या आंदोलनाची झळ विद्यार्थ्यांना का?
ता. १३ सप्टेंबरपासून कोल्हापूर महानगर परिवहन विभागाने गडमुडशिंगी (ता. करवीर)साठीची बससेवा बंद केली आहे. सध्या महापालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा शहरात तरी सुरळीत व पुरेशा पुरविल्या जाता का? याबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्‍यकता आहे. शहरातच पुरेशा सोयी उपलब्ध होत नसतील, तर इतर गावे घेऊन काय करणार? सध्या सर्वांत अधिक गैरसोय ही येथील विद्यार्थ्यांची होत आहे. इतर व्यावसायिक, नोकरदार वगैरे सर्व जण स्वतःच्या वाहनाने प्रवास करतील. मात्र, विद्यार्थी काय करणार? प्रत्येकाच्या पालकांची परिस्थिती रिक्षा लावण्याची वा स्वतः ने-आण करण्यासारखी नक्कीच नाही. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे.
सर्जेराव पाटील, गडमुडशिंगी (जि. कोल्हापूर)

भिशी हरवत चालली...
भिशी म्हणजे कोणताही कायदेशीर आधार नसलेली पतपेढी. पाच-दहा ओळखीच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी परस्पर विश्‍वासाने व सहकारी तत्त्वावर आर्थिक उलाढाल केली जाते, त्याला भिशी असे म्हटले जाते. ग्रामीण भागात फोफावलेली व चिठ्ठी टाकून दरमहा एकाची गरज भागविणारी मिनी पतपेढी आज मागे पडली आहे. भिशीमुळे बचत करायची सवय लागते. त्वरित भांडवल उपलब्ध झाल्याने छोटा-मोठा व्यवसाय सुरू करता येतो. आज भिशीची जागा बचत गटांच्या माध्यमातून सुरू आहे. भिशीमध्ये विश्‍वास व ओळखीच्या व्यक्ती असाव्या लागतात, नाही तर फसवणूक होते. व्यवहार सांभाळणारी व्यक्ती पळून गेली तर नुकसान ठरलेले. त्यासाठी मर्यादित व्यक्तींना घेऊन व्यवहार सांभाळले तर गरजवंताला मदतीचा फायदा होऊ शकतो.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)