गोकुळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ
गोकुळ

गोकुळ

sakal_logo
By

बाधित जनावरांसाठी
छावणी सुरू करा
‘गोकुळ’चे जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन
कोल्‍हापूर, ता. २७  ः लम्पी बाधित जनावरांना विलगीकरण करून त्यांची छावणी तयार करावीत, अशी मागणी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायतमार्फत लम्पीबाबत जनजागृती करावी. डास, माश्या, गोचीड, कीटक-नाशक यांचा प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवणे. बाधित जनावरांच्या ग्रामपंचायतमार्फत नोंदी घेऊन पशुसंवर्धन विभागास कळवणे. मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी. बाहेरून जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जनावरांचे लम्पी लसीकरण केल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत. लम्पी आजार गाय वर्गमध्ये होत असल्याने बाहेर राज्यातून म्हशी खरेदीस परवानगी द्यावी. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी. डी. ओ. व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची एकत्र ‘गोकुळ’च्या संचालक मंडळासोबत व अधिकारीच्या सोबत लम्पी आजाराबाबत आढावा बैठक घ्यावी. गोकुळमार्फत २ लाख लस खरेदी करून संघाच्या कार्यक्षेत्रात सर्व गाय वर्ग जनावरांना मोफत दिली आहे. आजअखेर १ लाख ६० हजारांपर्यंत लसीकरण झालेले आहे.  
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यू. व्ही. मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश दळवी, पशुसंवर्धन उपआयुक्त वा. ए. पठाण उपस्थित होते.