जमिन घेतांना बाजारभावा प्रमाणे किंमत द्या : गुरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमिन घेतांना बाजारभावा प्रमाणे किंमत द्या : गुरव
जमिन घेतांना बाजारभावा प्रमाणे किंमत द्या : गुरव

जमिन घेतांना बाजारभावा प्रमाणे किंमत द्या : गुरव

sakal_logo
By

53060
आजरा : नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांना निवेदन देताना शिवाजी गुरव, शेतकरी.

जमीन घेताना बाजारभावा
प्रमाणे किंमत द्या : गुरव
संकेश्‍वर-बांदा महामार्ग शेतकरी संघटनेची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २७ : महामार्ग करण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांची जमीन घेताना त्यांना बाजारभावाप्रमाणे किंमत द्या. त्यांना नुकसानभरपाई देऊन पुनर्वसन करा, अशी मागणी शिवाजी गुरव यांनी केली.
खेडे (ता. आजरा) येथे संकेश्‍वर-बांदा महामार्ग प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा आज मेळावा झाला. मेळाव्यात संकेश्‍वर-बांदा महामार्ग प्रकल्प शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या वेळी गुरव बोलत होते. ते म्हणाले, ‘‘महामार्ग करण्यासाठी आमचा विरोध नाही. पण शेतकऱ्यांची जमीन घेताना बाजारभावाप्रमाणे किंमत द्यावी. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही, तर प्रकल्प पूर्ण होणार नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काम केले जाणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील.’’
गणपती येसणे म्हणाले, ‘‘आमच्या जमिनी आमच्या नावावर आहेत. त्यातून बाजूपट्टीही आहे. मोबदला दिल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही.’’ या वेळी प्रकल्प समितीच्या प्रमुखपदी शिवाजी गुरव यांची निवड झाली. गणपती येसणे (सचिव), जयवंत थोरवत (खजानिस), हिंदुराव खोराटे, शिवाजी इंगळे, पांडुंरग पवार, विद्या कातकर, अनिल खोराटे, जयसिंग चव्हाण, दत्तात्रय कदम, दत्तात्रय नेसरकर, रवींद्र जाधव यांची सदस्यपदी नेमणूक झाली. यानंतर शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तातडीने बैठक लावण्याची मागणी करण्यात आली. बैठक न लावल्यास ६ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. जयवंत थोरवत यांनी आभार मानले.