विद्यार्थांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देणार; डॉ. बाचुळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देणार; डॉ. बाचुळकर
विद्यार्थांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देणार; डॉ. बाचुळकर

विद्यार्थांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देणार; डॉ. बाचुळकर

sakal_logo
By

विद्यार्थ्यांना बालविभागाचे
मोफत सभासदत्व देणार
डॉ. बाचुळकर : गंगामाई वाचन मंदिराची सभा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २९ : लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. भावी पिढी ज्ञानसंपन्न व संस्कारक्षम व्हावी. यासाठी ग्रंथालयाच्या बालविभागाचे सभासदत्व मोफत देणार आहे. यातून भविष्यातील वाचकवर्ग तयार होईल, असे प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले.
येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३३ वी वार्षिक सभा झाली. या वेळी डॉ. बाचुळकर बोलत होते. वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य संभाजी इंजल यांनी आदरांजली ठराव मांडला. डॉ. बाचुळकर यांनी स्वागत केले. महमदअली मुजावर, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, डॉ. अंजनी देशपांडे, विद्या हरेर, उपाध्यक्षा गीता पोतदार यांनी विविध पत्रकाचे वाचन केले. सुभाष विभूते यांनी सभासद वर्गणी व अनामत रक्कम वाढीबाबत माहिती दिली. याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपंचायतीने वाचनालयाच्या मालमत्तेवर आकारलेला कर माफ करणेबाब तसेच नगरपंचायतीकडून वाचनालयास दरवर्षी निधी मिळण्याबाबत प्रस्ताव द्यावा, असे बंडोपंत चव्हाण यांनी सांगितले. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले, ‘‘वाचनालयाचे यापूर्वीच कर माफ केला आहे. नगरपंचायतीकडून ग्रंथालयला निधी देण्याबाबतही प्रयत्न करू.’’ वाचनालयाने या वर्षी सर्व कार्यक्रम प्रायोजकांच्या देणगीतून आयोजित केल्याबद्दल कार्यकारी मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मारुती मोरे यांनी मांडला. डॉ. बाचुळकर यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. डॉ. अनिल देशपांडे, विजय बांदेकर, लक्ष्मण पाटील, डॉ. सुधीर मुंज, रवींद्र हुक्केरी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रकाश देसाई, शिवाजीराव इंजल, प्राचार्य अशोक साधळे, गुरू गोवेकर, प्रकाश पाटील, राजश्री गाडगीळ, सदानंद रोडगी उपस्थित होते. वामन सामंत यांनी सुत्रसंचालन केले. इराण्णा पाटील यांनी आभार मानले.