
शिवरायांचा पुतळा उभारण्यास प्रारंभ
04008
छत्रपती शिवरायांचा
पुतळा उभारण्यास प्रारंभ
जयसिंगपूरवासीयांच्या लढ्याला यश
जयसिंगपूर, ता. २७ : तब्बल ५० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर शहरात कोल्हापूर-सांगली महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा प्रकल्पाचे काम अखेर सुरू झाले. यामुळे शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.
पुतळा होण्यासाठी पन्नास वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. दोन वर्षांपूर्वी शंकर नाळे, चंद्रकांत जाधव-घुणकीकर यांच्यासह शिवप्रेमींनी जयसिंगपुरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा होण्यासाठी जोर धरला होता. तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नानंतर जागेचा विषय मार्गी लागल्यानंतर पालिकेने पुतळा प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया जूनमध्ये केली होती.
अखेर प्रत्यक्ष जागेवर कामाला सुरुवात केली आहे. एक वर्षापूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. नीता माने, संजय पाटील-यड्रावकर आदींच्या उपस्थितीत या हस्तांतर जागेवर शिवपुतळा प्रकल्पाचा प्रारंभ केला होता. शहरात शिवाजी महाराज स्मारक म्युझियम व ग्रंथालय होण्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यानंतर जूनमध्ये २ कोटी ६ लाख ८८ हजार रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवली.