पत्रकांच्या बातम्या एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकांच्या बातम्या एकत्रितपणे
पत्रकांच्या बातम्या एकत्रितपणे

पत्रकांच्या बातम्या एकत्रितपणे

sakal_logo
By

डॉ. लवटे यांचे साहित्य
प्रेरणादायी : डॉ. हिर्डेकर
कोल्हापूर : ‘‘डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे साहित्य, जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे’’, असे डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी सांगितले. डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार समिती, साहित्यविषयक उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी आणि हिंदी विभागातर्फे ‘डॉ. सुनीलकुमार लवटे : जीवन, कार्य आणि साहित्य’ यावर चर्चासत्र झाले. प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी डॉ. लवटे यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी डॉ. लवटे यांच्या ‘खाली जमीन वर आकाश’ आत्मकथनाचा संक्षिप्त आढावा घेतला. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. के. वळवी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सरोज पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आभार मानले. अनिल म्हमाणे, प्रा. डॉ. पल्लवी कोडक, प्रा. डॉ. अरुण कांबळे, प्रा. डॉ. एन. एस. जाधव आदी उपस्थित होते. ‘अंकुर’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन आणि डॉ. लवटे यांच्या समग्र ग्रंथाचे प्रदर्शन झाले. प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले यांचे सहकार्य लाभले.


‘गोखले’मध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन
कोल्हापूर : गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा झाला. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. एम. के. पवार यांनी स्वागत केले. ‘राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्त्व विकास’ यावर डॉ. ताहीर झारी म्हणाले, ‘एनएसएस’मधील विद्यार्थी परिपूर्ण असतो. सामाजिक बांधिलकी जपणारा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास एनएसएसमधील विद्यार्थी अग्रेसर असतो.’’ प्राचार्य डॉ. भुयेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना श्रमाचे, शिस्तीचे, व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार होतात, असे मत व्यक्त केले. प्रा. जयकुमार देसाई, दौलत देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांचे प्रोत्साहन लाभले. उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, प्रा. डॉ. एम. के. पवार, प्रा. डॉ. स्मिता गिरी आदी उपस्थित होते. प्रा. काझी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. के. डाके यांनी आभार मानले.

आंतरभारती पतसंस्थेतर्फे १५ टक्के लाभांश
कोल्हापूर ः आंतरभारती शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १५ टक्के लाभांशाची घोषणा केली. अध्यक्ष मानसिंग हातकर, धोंडिराम कोपार्डेकर यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला. श्री. हातकर यांनी स्वागत केले. व्यवस्थापक हेमंत माने यांनी सभेची नोटीस आणि मागील सभेचा वृत्तांत सांगितला. बाबासाहेब डोणे यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष मृदुला शिंदे यांनी आभार मानले. पार्वती बगली यांनी सूत्रसंचालन केले.

53206
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ करवीरतर्फे आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर.
रोटरी क्लब करवीरतर्फे कर्णबधिर दिन
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूरतर्फे कर्णबधिर दिनानिमित्त जनजागृती, तसेच नवजात बालकांची ओएई चाचणी घेतली. सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे कार्यक्रम घेतला. क्लबचे अध्यक्ष उदय पाटील यांनी स्वागत केले. डॉ. अभिजित मुळीक म्हणाले, ‘‘ओएई चाचणी कर्णबधिरत्वाचे लवकर निदान करण्यासाठी केली जाते. ही चाचणी कोणत्याही मॅटर्निटी रुग्णालयात करता येते.’’ डॉ. मंजुश्री रोहिदास, डॉ. वर्षा पाटील, ‘रोटरी करवीर’चे दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, सातापा पाटील, प्रकाश माने, शीतल दुग्गे, प्रवीणसिंह शिंदे उपस्थित होते. नीलेश भादुले यांनी काम पाहिले. सचिव स्वप्नील कामत यांनी आभार मानले.

‘न्यू’मध्ये आज माजी विद्यार्थी मेळावा
कोल्हापूर : न्यू हायस्कूल पेटाळा प्रशालेचा माजी विद्यार्थी मेळावा रविवारी (ता. २) आयोजित केला आहे. न्यू हायस्कूलची स्थापना १९२१ ला झाली. शाळेचा शतकपूर्ती महोत्सव २०२२-२३ वर्षात घेण्यात येणार आहे. यानिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. माजी शिक्षक, शिक्षकेतर गुरुजनांचा सत्कार होईल. सकाळी आठ ते ११ वेळेत मेळावा होईल. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक के. ई. पवार, पर्यवेक्षिका एस. आर. पाटील, जिमखाना प्रमुख सयाजीराव पाटील यांनी केले आहे.