गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

रेडेकर महाविद्यालयात सदृढ बालक स्पर्धा
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयात पोषण माह राबविण्यात आला. या अंतर्गत केदारी रेडेकर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सदृढ बालक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून राजगिरा लाडू व शेंगदाणे चिक्कीचे वाटप करण्यात आले. ध्रुव नाईक याची सदृढ बालक, तर शर्मिष्ठा सावंत हिची सदृढ बालिका म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही बालकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. डॉ. दीपक पोवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्या डॉ. वीणा कंठी, उपप्राचार्य डॉ. पंकज विश्वकर्मा, डॉ. विभावरी कोकणे, डॉ. उदय कोळी, डॉ. प्रसाद लोमटे, डॉ. सपना बसर्गे आदी उपस्थित होते.
----------------
53215
बुगडीकट्टी : वर्धिनी फेरीअंतर्गत बांधणी झालेल्या स्वयंसहाय्यता समूहाला अभिलेख वाटप करताना दयानंद पाटील.

बुगडीकट्टीत वर्धिनी फेरीची सांगता
गडहिंग्लज : बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत वर्धिनी फेरीचे आयोजन केले होते. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्याची सांगता झाली. या वर्धिनी फेरीअंतर्गत बुगडीकट्टी येथे ३१ स्वयंसहायता समूहाची बांधणी करण्यात आली. त्या अंतर्गत गावातील २९२ कुटुंबांना या अभियानामध्ये समाविष्ट करण्यात आले. यामध्ये विधवा, परितक्त्या, अपंग महिलांच्या गटाचाही समावेश आहे. सरपंच दयानंद पाटील यांच्या हस्ते उमेद अभियानाचे अभिलेख सर्व गटांना देण्यात आले. उपसरपंच धनगर, ग्रामसेवक किशोर पाटील आदी उपस्थित होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका अभियान व्यवस्थापक दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वयक महादेव गुरव, वर्धिनी शुभांगी खटावकर, अर्चना गाडीवडर, जयश्री माने व पंकजा कांबळे यांनी नियोजन केले.
-----------------
53217
संकेश्‍वर : अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना संघराज विटेकरी. शेजारी शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अन्नदान
गडहिंग्लज : येथील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शारदीय नवरात्रोत्सव व गडहिंग्लज शहराध्यक्ष संघराज विटेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. संकेश्‍वर येथील अनाथाश्रमातील १०० मुलांना जेवण देण्यात आले. या अनाथ मुलांसोबत विटेकरी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक इंदुलकर, तालुकाध्यक्ष शाहीद खणदाळे, सतीश भोगाणे, शिवशंकर हिरेमठ आदी उपस्थित होते.
-----------------
दत्तप्रसादला २५ लाखांचा नफा
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील दत्तप्रसाद पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात झाली. संस्थेला अहवाल सालात २५ लाख आठ हजार १५७ रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष के. बी. पोवार यांनी दिली. १४ टक्के लाभांश देण्याच्या निर्णयाला सभासदांनी मान्यता दिली. पहिली ते चौथी व दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व निवृत्त सभासदांना गौरविण्यात आले. व्यवस्थापक गणपती कावणेकर यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले. त्यावर चर्चा होऊन सभासदांनी मान्यता दिली. संस्थेतील ठेवी व कर्जाच्या सुरक्षिततेसाठी विमा योजना, सभासदांसाठी मृत्यूठेव योजना लागू करण्याची सूचना सभासदांनी केली. नारायण भोईटे, महेश आयवाळे, मधुकर जांभळे, आबासाहेब शेडेकर, गुरुदेव साबळे, बाळासाहेब देवेकर, नंदकुमार सुतार, श्रीनाथ पाटील, बाळकृष्ण कांबळे, बाबासाहेब चौगुले यांनी चर्चेत भाग घेतला. संचालक सखाराम मोटे, जयसिंग येसादे, शिवनारायण पाटील, सुभाष कांबळे, जयश्री जांभळे, वृषाली साबळे आदी उपस्थित होते. पंडित सुतार यांनी आभार मानले.
------------------
‘जागृती’मध्ये भगतसिंगांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांतिवीर भगतसिंग यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते भगतसिंगांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रा. आर. बी. पाटील यांनी भगतसिंग यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. एस. बी. मगदूम, प्रा. ए. एम. नवले यांचीही भाषणे झाली. यावेळी विकास बुरुड, अमर लोखंडे, विशाल बंदी आदी उपस्थित होते. ग्रंथपाल प्रशांत कोरे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णकांत बामणे यांनी आभार मानले.
------------------
शिवराजमध्ये औषधनिर्माणशास्त्र दिन
गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी व केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे औषधनिर्माणशास्त्र दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. संतोष कुरबेट्टी यांनी स्वागत केले. शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक नितीन पेडणेकर, संदीप मिसाळ, तालुकाध्यक्ष विजय शिवबुगडे, शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, पर्यवेक्षक तानाजी चौगुले उपस्थित होते.