मुख्य सचिव आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य सचिव आढावा
मुख्य सचिव आढावा

मुख्य सचिव आढावा

sakal_logo
By

‘फ्लॅगशीप’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव; जिल्ह्यात ४.१६ लाख लाभार्थ्यांचा माहिती संकलित
कोल्हापूर, ता.४ ः राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाने केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिक गतीने काम करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी केले.
मुंबई येथून ऑनलाईनद्वारे श्री. श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री. श्रीवास्तव ‘पीएम किसान योजनेचा लाभ संबंधित पात्र शेतकरी लाभार्थ्यांना मिळण्यासाठी भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे माहिती भरण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. एकही पात्र लाभार्थी डेटा अपलोड करण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित जिल्हा प्रशासनाने घ्यावी.’
पीएम किसान योजनेत देश पातळीवर राज्याचा ऑनलाईन माहिती भरण्यात आठवा क्रमांक असून, अजूनपर्यंत एकोणीस लाख शेतकऱ्यांचा डाटा भरावयाचा आहे. या योजनेत आत्तापर्यंत अकरा हफ्ते वितरित करण्यात आलेले असून, एखाद्या शेतकरी अपात्र ठरवत असताना त्याबाबत अत्यंत दक्षपणे चौकशी करावी. प्रत्यक्ष आयकर भरणा करत असेल असाच शेतकरी अपात्र ठरेल असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख ८३ हजार लाभार्थ्यांपैकी चार लाख १६ हजार ७५१ लाभार्थ्यांचा डाटा भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करून अपलोड केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.