मुत्नाळला गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुत्नाळला गुणवंतांचा सत्कार
मुत्नाळला गुणवंतांचा सत्कार

मुत्नाळला गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

53294
मुत्नाळ : एस. डी. हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कारप्रसंगी डॉ. सतीश घाळी, प्रभूलिंगेश्‍वर महास्वामीजी, समाधान घुगे, व्ही. एस. शिंदे आदी.

मुत्नाळला गुणवंतांचा सत्कार
गडहिंग्लज : मुत्नाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे व हिटणीचे प्रभुलिंगेश्‍वर महास्वामीजी प्रमुख पाहुणे होते. पर्यवेक्षक एम. बी. गुलगुंजी यांनी स्वागत केले. दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्या घाटगे, बनशंकरी पाटील, साधना कबुरी, सुकन्या बाडकर, विद्या कदम, ज्योती मुगळी, साक्षी जाधव, सानिका राऊत, नवीन डंगी, चेतन हत्ती, सुचित्रा पाटील, दीपा हलगडगी, रोहिणी देसाई, आदिती निकम, शार्दूल पाटील, प्रज्वल पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. ‘सिंबायोसिस’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. घाळी यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक व्ही. एस. शिंदे, सुनील देसाई, आर. बी. लोखंडे, व्ही. एस. कागवाडे, एस. ए. चौगुले, पी. बी. रक्ताडे, एस. पी. सावंत आदी उपस्थित होते. ए. आर. मसाळे यांनी आभार मानले.