सर्वसाधारण सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसाधारण सभा
सर्वसाधारण सभा

सर्वसाधारण सभा

sakal_logo
By

संस्थांच्या सभांना
डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
---
शासनाचा निर्णय; लेखापरीक्षण करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुभा
................
कोल्हापूर, ता. २९ ः सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत घेण्याबरोबरच संस्थांचे लेखापरीक्षण करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज शासनाने घेतला. या निर्णयाने ३० सप्टेंबरपूर्वी सर्वसाधारण सभा घेण्याची संस्थांची घाई संपुष्टात आली.
राज्यात २०२० मध्ये कोरोनाची साथ होती, त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसह लेखापरीक्षण व सर्वसाधारण सभांना स्थगिती दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सुरुवातीला सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्चपर्यंत तर लेखा परीक्षणासाठी डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तथापि, दोन वर्षांनी संस्थेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यास अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रत्यक्ष सहभागाद्वारे करावयाच्या कामकाजावरील स्थगिती १२ मे २०२२ रोजी उठवली. पण संस्थांचे लेखापरीक्षण करण्यास विलंब झाल्याने अधिनियमात विहीत केलेल्या कालावधीत संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्याची बाब विविध सहकारी संस्थांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. या बाबीचा विचार करून शासनाने आज लेखा परीक्षणासाठी ऑक्टोबर २०२२ पर्यंत तर सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी आदेश काढले.
..................
निवडणुकीवरील स्थगिती कायम
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. उद्या (ता. ३०) हा कालावधी संपत असून या संदर्भात शासनाचे आदेश काय येणार? याविषयी उत्सुकता आहे. तातडीने निवडणुका घेण्याचे आदेश झाल्यास जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांसह शेकडो संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
...........