तनिष्क जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष्क जाहिरात बातमी
तनिष्क जाहिरात बातमी

तनिष्क जाहिरात बातमी

sakal_logo
By

तनिष्कतर्फे ‘आलेख्या’
फेस्टिव्ह कलेक्शनचे आयोजन

कोल्हापूर, ता. २९ : यंदाच्या सणासुदीच्या काळात तनिष्कने ‘आलेख्या’ हे नवे फेस्टिव्ह कलेक्शन सादर केले आहे. यात प्राचीन भारतीय कलांचे सौंदर्य आणि समृद्धतेच्या सन्मानार्थ तयार केलेले आलेख्या कलेक्शन मिनिएचर व पिछवाई चित्रांपासून प्रेरणा घेऊन डिझाईन केले आहे. यानिमित्ताने राजेशाही शान ही संकल्पना नव्याने प्रस्तुत केली. प्राचीन भारतीय चित्रांपासून प्रेरणा घेऊन हे शानदार आधुनीक दागिने डिझाईन केले आहेत. नाजूक, जटिल कामगिरी आणि मनमोहक रंगसंगती असलेले हे दागिने अद्भुत व अव्दितीय आहेत. आलेख्यामध्ये नाजूकपणा व परंपरांचा वारसा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जीवन चित्रणाची कला पिछवाईमधील जटिल चित्रे व मुघल, राजस्थानी आणि पहाडी राजदरबारांतील राजसी कला चित्रांपासून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन निर्माण केले आहे. ‘टायटन’चे डिझाईन विभागप्रमुख अभिषेक रस्तोगी म्हणाले, ‘‘सुंदर पद्धतीने डिझाईन केलेले, सर्वोत्तम दागिने ग्राहकांसाठी प्रस्तुत करण्यासाठी प्रयत्नशील असतो.’’ ‘आलेख्यार् हे नवे कलेक्शन शानदार सणांचा प्रत्येक क्षण सोनेरी बनवतील. पिछवाई आणि मिनिएचर चित्रांच्या भारतीय काळांपासून प्रेरणा घेऊन हे दागिने बनवले आहेत. आधुनिक मिनाकारी मोटिफ व रंगांनी त्यांना सजवले आहे. या कलेक्शनमध्ये नेकलेस, इयररिंग्स आणि विविध दागिन्यांचा समावेश आहे. आलेख्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी जवळच्या तनिष्क शोरूमला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.