जाहीरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहीरात बातमी
जाहीरात बातमी

जाहीरात बातमी

sakal_logo
By

53445

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ‘एनएसएस’चे मोठे योगदान
डॉ. व्ही. एन. शिंदे ः ‘डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी’त कार्यक्रम

कोल्हापूर, ता. ३ ः राष्‍ट्रीय सेवा योजना (एनएसएस) राष्‍ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांची जडण-घडण व व्यक्तिमत्त्व विकासात ‘एनएसएस’चे मोठे योगदान असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते. सामाजिक जाणीव अधिक समृद्ध होते, असे डॉ. शिंदे म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्‍व आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारे बदल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल पाटील, डॉ. नवनीत सांगले, प्रा. संकेत शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे १८५ स्वयंसेवक उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी करून दिली. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर यांनी आभार मानले. संकेत चौगले, सौरभ केसरकर, वैभव नगने, धनश्री बोडेकर, पूनम पाटील, अक्षता कवठेकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.