सभासद, ग्राहकांना अद्यावत सेवा देण्यास कटिबध्द; डॉ. अनिल देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासद, ग्राहकांना अद्यावत सेवा देण्यास कटिबध्द; डॉ. अनिल देशपांडे
सभासद, ग्राहकांना अद्यावत सेवा देण्यास कटिबध्द; डॉ. अनिल देशपांडे

सभासद, ग्राहकांना अद्यावत सेवा देण्यास कटिबध्द; डॉ. अनिल देशपांडे

sakal_logo
By

53447


सभासद, ग्राहकांना अद्ययावत
सेवा देण्यास कटिबद्ध
डॉ. अनिल देशपांडे; आजरा अर्बन बॅंकेची वार्षिक सभा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० : बॅंकिंग व्यवसायाचे डिजिटलायझेशन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आजरा अर्बन बॅंकेनेही नवीन तंत्रज्ञान, सेवा सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. सभासद व ग्राहकांना तत्पर व सुखकर सेवा देण्यास बॅंकेचे व्यवस्थापक मंडळ आग्रही व कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी केले.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात दि आजरा अर्बन को-ऑप. बॅंकेची ६२ वी वार्षिक सभा झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. देशपांडे बोलत होते. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, उपाध्यक्ष किशोर भुसारी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी प्रमुख उपस्थित होते.
प्रकाश वाटवे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. डॉ. देशपांडे म्हणाले, ‘बॅंकेकडून ग्राहकांना कॉन्टॅक्ट लेक रूपे एटीएम कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. गुगल पे, फोन पे या सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील. अहवाल सालात बॅंकेला चार कोटी ६३ लाखांचा नफा झाला आहे. सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार आहे.’ अशोक चराटी म्हणाले, ‘(कै.) काशिनाथ चराटी, (कै.) माधवराव देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विचारावर बॅंकेची वाटचाल सुरू आहे. बॅंकेला शेड्यूल्डचा दर्जा देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न सुरू आहे. देशातील १४६५ बॅंकांमध्ये बॅंकेचा ६५ वा क्रमांक लागतो. अहवाल सालात बँकेने १२५० कोटींचा व्यवसाय केला असून नव्या शाखा सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.’ वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले सभासद, मारुती डेळेकर, संभाजी बापट, जलतरणपटू महेश बुगडे, डॉ. आनंद बल्लाळ यांचा यावेळी सत्कार झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी सु. ई. डांग, डॉ. दीपक सातोस्कर, रमेश कुरुणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, शैला टोपले, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, संचालक व अण्णा भाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष किशोर भुसारी यांनी आभार मानले.