आरोग्य सुविधा पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सुविधा पाहणी
आरोग्य सुविधा पाहणी

आरोग्य सुविधा पाहणी

sakal_logo
By

53465

मनपा प्रशासकांकडून स्वच्छतेची पाहणी
कोल्हापूर, ता. २९ : शहरातील तीन प्रभागात आरोग्य स्वच्छतेबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी पाहणी केली. त्यांनी सुविधांबाबत विचारणा केली.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यशवंत लॉन मेनरोड, गंजीमाळ येथील हॉल व बेलबाग उद्यान परिसराची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून दररोज घंटागाडी येते का, भागामध्ये दैनंदिन सफाई होते का याची विचारणा केली. महापालिकेच्या वतीने दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर, आर. के. पाटील, प्रमोद बराले, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर व आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे उपस्थित होते. दरम्यान, राजाराम कॉलेज ते केएसबीपी चौक ते मिलीटरी कॅम्प ते टेंबलाई वाडी ते उड्डाणपूल ते कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक, यल्लमा मंदिर ते भक्ती पूजानगर चौक या मेनरोडच्या फुटपाथ व दुभाजकांची स्वच्छता करण्यात आली.