माता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माता अभियान
माता अभियान

माता अभियान

sakal_logo
By

53463

‘माता सुरक्षित..’अभियाअंतर्गत
८७२ महिलांची आरोग्य तपासणी


कोल्हापूर, ता. २९ : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील १८ वर्षावरील ८७२ महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे शुक्रवारी (ता.३०) व ३ ऑक्टोबरला गरोदर मातांसाठी सोनोग्राफी शिबिरही आयोजित केले आहे.
नवरात्रीच्या निमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत अभियान राबविण्यात येत आहे. ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांना आवश्यक आरोग्य तपासण्या (रक्त, लघवी) करून आवश्यक औषधे देऊन समुपदेशन करण्यात येत आहे. उच्चरक्तदाब निदान झालेल्या २१, रक्तक्षय आढळलेल्या २, मधुमेह निदान झालेल्या ४ महिला आढळल्या. ४२ महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली. गर्भधारणापूर्व २३ महिलांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली. १०६ गरोदर मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी उच्च रक्तदाब निदान झालेली १ व १४ गरोदर मातांचे कोविड लसीकरण करण्यात आले. ४ गरोदर मातांचे नवीन बँक खाते उघडण्यात येऊन त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आले. ३० वर्षावरील २०४ महिलांची आरोग्य तपासणी केली. त्यापैकी ३ महिलांचे थायरॉईडचे निदान झाले. २१ महिलांचे उच्च रक्तदाब, ६ महिलांचे मधुमेह व २ महिलांचे हृदयसंबंधी निदान झाले.