निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन
निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन

निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन

sakal_logo
By

53460

निर्यातदारांनी उज्ज्वल संधीचा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी रेखावार; निर्यातदारांची कार्यशाळा व प्रदर्शन

कोल्हापूर, ता. २९ ः निर्यातदारांना उज्ज्वल संधी आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज येथे केले. जिल्हा उद्योग केंद्र निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्र व स्मॉल इंडस्ट्जि डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया सिडबीने आयोजन केले आहे. उद्यमगनरातील इंजिनिअरिंग असोसिएशन प्रदर्शन सुरू आहे. उद्या (ता.३0) शेवटचा दिवस आहे.
दिवस भर चाललेच्या कार्यशाळेत राष्ट्रीय स्तरावरील निर्यात सल्लागार मिहीर शहा यांनी निर्यातदारांना सहज सुलभ निर्यात करता यावी, निर्यातदाराची नोंदणी, उत्पादन निवड, निर्यातीसाठी बाजारपेठ निवडणे, आयातदार ग्राहक कसे शोधावेत याबाबत मार्गदर्शन केले. सल्लागार केशव ताम्हणकर यांनी विविध विभागात निर्यातीच्या संधी तसेच निर्यातदारांना निर्यातवृध्दीसाठी प्रोत्साहन या विषयावर मार्गदर्शन केले. औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी हर्षद दलाल, संजय पेंडसे यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश शेळके, व्यवस्थापक मंजूषा चव्हाण, दुर्गा पाटील, प्रसाद काटाळे, सतिश जाधव, सुरेश सरंजामे, प्रशांत चव्हाण, नाबार्डचे अशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक गणेश गोडसे, सिडबी बॅंकेचे व्ही. प्रसाद, सह महाव्यवस्थापक बॅंक ऑफ इंडियाचे किरण पाठक, निर्यातदार उद्योजक उपस्थित होते.