एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपी देण्याचा  निर्णय रद्द करा
एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करा

एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करा

sakal_logo
By

दोन टप्प्यांत एफआरपी
देण्याचा निर्णय रद्द करा
विविध संघटनांची सहकार मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर, ता. २९ : दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय रद्द करा, अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, जयशिवरायचे शिवाजी माने व बळिराजा संघटनेचे बी. जी. पाटील यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्‍याकडे केली. चुडमुंगे म्हणाले, ऊस तोड झाल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. वेळेत एफआरपी न दिल्यास १५ टक्के व्याजही द्यावे अशी तरतूद आहे. मागील हंगामाचा सरासरी साखर उतारा व मागील हंगामाचा तोडणी वाहतुकीचा खर्च वजा करून हंगामाच्या सुरुवातीला प्रत्येक कारखान्याची एफआरपी जाहीर केली जाते. प्रचलित पद्धत मागच्या महाआघाडी सरकारने बदलली आहे. ज्या हंगामाची सरासरी रिकव्हरी व त्या त्या हंगामाचा तोडणी वाहतुकीचा खर्च वजा करून हंगाम संपल्यावर एफआरपी निश्चित करणारे धोरण केले आहे. हे धोरण शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहे. ते बदलून पूर्वीप्रमाणे दर ठरवण्याचे धोरण अवलंबावे.
संघटनांच्या मागणीवर सहकार मंत्री सावे यांनी सकारात्मकता दाखवली व सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत शेतकरी हिताचा निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.