घरफाळा घोटाळा अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा घोटाळा अहवाल
घरफाळा घोटाळा अहवाल

घरफाळा घोटाळा अहवाल

sakal_logo
By

मनपा फोटो
घरफाळा घोटाळ्याची
वस्तुस्थिती समोर येणार

सहाय्यक आयुक्तांकडे अहवाल सादर

कोल्हापूर, ता. २९ ः महापालिकेतील घरफाळा घोटाळ्यातील कागदपत्रांची छाननी करून तत्कालीन करनिर्धारक वर्षा परीट यांनी अहवाल सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे यांच्याकडे सादर केला. त्यांच्याकडून उपायुक्तांमार्फत तो प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दोन दिवसांत सादर केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच घोटाळा प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येऊन पुढील कारवाई करण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी फौजदारी कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा चौकशी होऊन नवीन अहवाल तयार केला. या दोन्हीत जबाबदारीची रक्कम वेगवेगळी होती. तीन कोटी १८ लाख एकातील तर दुसऱ्यातील एक कोटी ५५ लाखांची रक्कम तसेच त्यावेळी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत प्रशासकांकडून स्पष्टीकरण मागवले होते. त्याबाबत तत्कालीन करनिर्धारक परीट यांच्याकडून अहवाल आला नसल्याने प्रशासकांनी त्यांना नोटीसही बजावली होती. त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला.
पूर्वीच्या अहवालातील १४ प्रकरणांमधील कागदपत्रांची छाननी करून जबाबदारी निश्‍चित करण्यात येत होती. त्यासाठी परीट यांच्यासह सारी यंत्रणा दोन दिवस कामात होती. आज परीट यांनी साहाय्यक आयुक्त घार्गे यांच्याकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे.

कोट
कागदपत्रांची छाननी करून परीट यांनी अहवाल दिला आहे. माझ्याकडे आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेऊ.
- डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक.