तिरूपतीत कोल्हापूरकरांसाठी लवकरच धर्मशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरूपतीत कोल्हापूरकरांसाठी लवकरच धर्मशाळा
तिरूपतीत कोल्हापूरकरांसाठी लवकरच धर्मशाळा

तिरूपतीत कोल्हापूरकरांसाठी लवकरच धर्मशाळा

sakal_logo
By

५३४७९
कोल्हापूर ः तिरुपती येथे कोल्हापुरातील भाविकांसाठी धर्मशाळा उभारावी, या मागणीचे निवेदन तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांना गुरुवारी देताना देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे. शेजारी महादेव दिंडे, के. रामाराव, सौरभ बोरा, के. रामाराव, महेश जाधव आदी.

तिरुपतीत कोल्हापूरकरांसाठी लवकरच धर्मशाळा
वाय. व्ही. सुब्बारेड्डी; देवस्थान समितीतर्फे निवेदनानंतर ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः देशातील धार्मिक पर्यटनात करवीर निवासिनी अंबाबाई आणि तिरुपती देवस्थानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोल्हापुरातील भाविकांसाठी तिरुपती येथे तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टतर्फे लवकरच धर्मशाळेसाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी आज येथे दिली. ट्रस्टतर्फे आज श्री अंबाबाईसाठी देवस्थान समितीकडे मानाचे महावस्त्र अर्पण करण्यात आले. यावेळी देवस्थान समितीने त्यांना धर्मशाळेबाबतचे निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी धर्मशाळेबाबतचे निवेदन दिले. करवीर निवासिनी श्री अंबाबाईबरोबरच तिरुपती देवस्थानला पौराणिक महात्म्य आहे. नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला मानाचे महावस्त्र अर्पण केले जाते. तिरुपती देवस्थानसाठी हरिप्रिया एक्स्‍प्रेसबरोबरच विमानसेवाही उपलब्ध असून, भाविक मोठ्या संख्येने तिरुपतीला जातात. त्यामुळे तिरुपती येथे कोल्हापुरातील भाविकांसाठी धर्मशाळेची आवश्यकता असून त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टने त्यासाठी प्रयत्न करावेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत सुब्बारेड्डी म्हणाले, ‘कोल्हापुरातील भाविकांसाठी धर्मशाळा आवश्यकच आहे. फक्त तिरुपती येथे बांधकामासाठी सध्या परवानगी नसल्याने जागा देता येणे शक्य होणार नाही. ट्रस्टच्या मालकीची एखादी इमारत या धर्मशाळेसाठी नक्कीच दिली जाईल.’
दरम्यान, यावेळी सुवर्णाम्मा सुब्बारेड्डी, सौरभ बोरा, ट्रस्टचे सदस्य मिलिंद नार्वेकर, व्यंकटेश स्वामी, के. रामाराव, लक्ष्मीनिवास बियाणी, शिवसेनचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, शैलेश बांदेकर आदी उपस्थित होते.

तिरुपतीचे मंदिर कोल्हापुरातही असावे, अशी अनेक भाविकांची इच्छा आहे; पण श्री अंबाबाईसह तिरुपती देवस्थानलाही मोठे पौराणिक महात्म्य असून आहे तीच परंपरा आपण पुढे नेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाने नवी मुंबईत तिरुपती मंदिरासाठी बारा एकर जागा उपलब्ध केली असून, तेथे येत्या दोन वर्षांत भव्य मंदिराची उभारणी केली जाणार आहे.
- वाय. व्ही. सुब्बारेड्डी, अध्यक्ष, टीटीडी ट्रस्ट