चैतन्य शिक्षण संस्‍थेची ऑनलाईन सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैतन्य शिक्षण संस्‍थेची ऑनलाईन सुनावणी
चैतन्य शिक्षण संस्‍थेची ऑनलाईन सुनावणी

चैतन्य शिक्षण संस्‍थेची ऑनलाईन सुनावणी

sakal_logo
By

चैतन्य शिक्षण संस्‍थेची
ऑनलाईन सुनावणी

कोल्‍हापूर, ता. २९ : गडहिंग्‍लज येथील चैतन्य शिक्षण संस्‍था संचालित चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाची तपासणी करण्यात आली होती. यात अतिशय गंभीर मुद्दे उपस्‍थित करण्यात आले. शाळेची मान्यता रद्द होण्यास जिल्‍हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांनी शिफारस केली आहे. त्यानुसार या प्रकरणाची ४ ऑक्‍टोबरला ऑनलाईन सुनावणी होणार आहे. चौकशी अहवाला शाळेचा अनागोंदी कारभार असल्याचे म्‍हटले आहे. या सुनावणीची नोटीस संस्‍थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांना बजावण्यात आली आहे. याबाबतचे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्‍तालयाचे सहा‍यक आयुक्‍त शिवाजी शेळके यांनी दिले आहेत.