आज वास्तू एक्स्‍पो प्रदर्शन उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज वास्तू एक्स्‍पो प्रदर्शन उदघाटन
आज वास्तू एक्स्‍पो प्रदर्शन उदघाटन

आज वास्तू एक्स्‍पो प्रदर्शन उदघाटन

sakal_logo
By

लोगो वापरावा...
चला, घर, फ्लॅट, प्लॉट
बुकिंग करायची वेळ झाली
‘सकाळ’च्या ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’चे आज उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः चला घर, फ्लॅट बुकिंग करायची वेळ झाली...‘सकाळ’च्या ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’चे उद्या (ता. १) पासून उद्‌घाटन होत आहे. सलग तीन दिवस होणाऱ्या या एक्स्पोचे उद्‍घाटन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आहेत. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार उपस्थित असणार आहेत. गुरुप्रसाद डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स प्रस्तुत प्रदर्शन आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्यानिमित्ताने वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन तीन ऑक्टोबरपर्यंत केले आहे. प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, आता केवळ उद्‍घाटनाची उत्सुकता आहे. एकाच छताखाली जिल्ह्यातील बहुतांशी गृह प्रकल्पांची माहिती येथे पाहण्याची संधी आहे. पंधरा लाखांपासून पाच कोटींपर्यंतचे घर, फ्लॅट, प्लॉटची रेंज येथे आहे. घर, फ्लॅट, रो-हाऊस, बंगलो, पेंन्ट हाऊस बरोबरच रिकाम्या प्लॉटचीही माहिती मिळणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठदरम्यान प्रदर्शन खुले आहे.
वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. बजेटमध्ये स्वप्नातील घर सत्यात उतरण्यासाठी, ही एक संधीच आहे. व्यावसायिकांसाठी कमर्शिअल कॉम्प्लेक्स कोठे कोठे आहे, हे सुद्धा प्रदर्शनात पाहता येणार आहे. वन बीएचके, टू आणि थ्री बीएचके फ्लॅटसुद्धा राहण्यास मिळणार आहेत. वेगवगेळ्या प्रकल्पांच्या माहितीसह अनेक सवलीतींही जाहीर होणार आहेत. कोल्हापूर आणि जिल्ह्यातील रिकाम्या प्लॉटचीही माहिती येथे मिळणार आहे. एवढंच नव्हे तर सवलतींचा वर्षाव घेऊन अर्थसहाय्य सुद्धा येथे उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - लक्ष्मीकांत औंधकर - ९५२७९७२५००

‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’ येथे भरणार
० बसंत-बहार चित्रपटगृहाशेजारील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये
० उद्‌घाटन सोहळा शनिवारी सकाळी अकरा वाजता
० ग्राहकांसाठी सलग तीन दिवस सुरू राहणार
० सर्वांसाठी प्रवेश आणि पार्किंग मोफत

यांचा आहे सहभाग
आदी ईन्फ्रा-एस. ए. मगदूम प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्स
एस. एस. बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स
श्री. माधुपुरी कन्स्ट्रक्शन
मेट्रोलाईफ सिटी डेव्हलपर्स एलएलपी
देशपांडे इन्फ्रा
दी आयडियल कन्स्ट्रक्शन
बटू बिल्डर्स
श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्‍हलपर्स
बेडेकर लाईफ स्पेस एलएलपी
रामसिना ग्रुप
रायसन्स ग्रुप
मे. सूरज इस्टेट डेव्‍हलपर्स
वरद डेव्‍हलपर्स
अविष्कार इन्फ्रा
गुरुप्रसाद डेव्‍हलपर्स ॲण्ड बिल्डर्स
बॅंक ऑफ बडोदा
मेट्रिक होम्स प्रायव्हेट लिमिटेड
निवारा बिल्डर्स ॲण्ड डेव्‍हलपर्स