‘गोवा शिपयार्ड’च्या वित्त संचालकपदी सुनील बागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोवा शिपयार्ड’च्या वित्त संचालकपदी सुनील बागी
‘गोवा शिपयार्ड’च्या वित्त संचालकपदी सुनील बागी

‘गोवा शिपयार्ड’च्या वित्त संचालकपदी सुनील बागी

sakal_logo
By

53596
सुनील बागी

‘गोवा शिपयार्ड’च्या वित्त
संचालकपदी सुनील बागी
गडहिंग्लज, ता. ३० : येथील सुनील शिवलिंगाप्पा बागी यांची गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या (जीएसएल) वित्त संचालकपदी निवड झाली. नुकताच त्यांनी हा पदभार स्वीकारला. जीएसएल हे नौदल, तटरक्षक दलासाठी युद्धनौका बांधणारे आणि मित्र देशांना निर्यात करणारे प्रमुख भारतीय शिपयार्ड आहे.
बागी हे मूळचे गडहिंग्लजचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण जागृती हायस्कूल व शिवराज महाविद्यालयातून झाले आहे. त्यांनी १९९२ मध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये लेखाधिकारी म्हणून सेवेला प्रारंभ केला. तीस वर्षांच्या कठोर परिश्रमाने ते या पदापर्यंत पोहचले आहेत. यापूर्वी वित्त मुख्य महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे. कंपनीची उद्दिष्टे साध्य करणे व नफ्याच्या नियोजनासाठी आर्थिक धोरणे विकसित करण्यात त्यांचे महत्त्‍वाचे योगदान आहे. कंपनीच्या व्यवसाय विकासात आणि जीएसएलच्या क्षमता वाढीसह आधुनिकीकरण कार्यक्रमात त्यांनी महत्त्‍वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंतचा अनुभव व कंपनीच्या विकासातील योगदानामुळे त्यांना या पदाची संधी मिळाली.