निरुपणकार जाधव यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरुपणकार जाधव यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार
निरुपणकार जाधव यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार

निरुपणकार जाधव यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार

sakal_logo
By

53409
मारुतीराव जाधव

निरुपणकार जाधव यांना
‘दिनकर मास्तर’ पुरस्कार
सोमवारी शिंदे इन्स्टिट्यूटमध्ये वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्ट व शिंदे परिवारातर्फे दरवर्षी देण्यात येणारा दिनकर मास्तर पुरस्कार यंदा संत तुकाराम महाराज गाथेचे निरुपणकार मारुतीराव जाधव (तळाशीकर) यांना जाहीर झाला. सोमवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता भडगावच्या डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल.
शिक्षण व समाजकारणात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना दरवर्षी ट्रस्टतर्फे दिनकरराव के. शिंदे (नूल) यांच्या नावे ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार दिला जातो. मध्यंतरी कोरोनामुळे यात खंड पडला होता. दरम्यान, यावर्षी निरुपणकार जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस प्रमुख पाहुणे आहेत. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, सचिव स्वाती कोरी यांनी केले आहे.