महापालिका तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका तपासणी
महापालिका तपासणी

महापालिका तपासणी

sakal_logo
By

महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये
उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीतील निष्कर्ष
कोल्हापूर, ता. ३० ः महापालिकेच्या वतीने जुलै व ऑगस्टमध्ये विविध विभागांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, ॲनिमिया यांचे रुग्ण जास्त दिसून आले. त्यातील विभागीय कार्यालय एक, तीन, चारमधील कर्मचाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त दिसून आले. विभागीय कार्यालय दोनमध्ये मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. दहा टक्के कर्मचाऱ्यांना पुढील तपासणी करण्याची सूचना दिली आहे.
जुलै तसेच ऑगस्टमध्ये चार टप्प्यांत तपासणी झाली. त्यामध्ये कीटकनाशक, ड्रेनेज, स्मशानभूमी, भटकी जनावरे बंदोबस्त पथक, झीरो गार्बेज पथक, कत्तलखाना, घनकचरा व्यवस्थापन तसेच विविध वॉर्ड कार्यालयांतील सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक विभागीय कार्यालयात २५० ते ३०० वर कर्मचाऱ्यांची तपासणी झाली. प्रत्येक कार्यालयातील निम्मे कर्मचारी व्यवस्थित असले तरी उर्वरित निम्म्यांमध्ये काही ना काही आजार आढळून येत होते. काहींचे निदान करण्यासाठी आणखी काही तपासण्या करणे गरजेच्या ठरल्या. ११५१ कर्मचाऱ्यांच्या झालेल्या तपासणीतून उच्च रक्तदाबाचे १३८, ॲनिमियाचे ५६, मधुमेहाचे ५९, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले २५ तर इतर आजारांचे ५८ कर्मचारी आढळले. २१७ कर्मचाऱ्यांना पुढील तपासणी करण्यास सांगितले.

विभागीय कार्यालयनिहाय स्थिती
कार्यालय क्रमांक एक ः
सामान्य २०९, ॲनिमिया १८, उच्च रक्तदाब ६२, मधुमेह १६, उच्च रक्तदाब व मधुमेह १५, इतर ३, पुढील तपासणीसाठी ६३


कार्यालय क्रमांक दोन ः
सामान्य १५४, ॲनिमिया १९, उच्च रक्तदाब १२, मधुमेह २२, उच्च रक्तदाब व मधुमेह १, इतर २२, पुढील तपासणीसाठी ८०


कार्यालय क्रमांक ३ ः
सामान्य २१९, ॲनिमिया ८, उच्च रक्तदाब ४३, मधुमेह ६, उच्च रक्तदाब व मधुमेह ४, इतर १२, पुढील तपासणीसाठी १९

कार्यालय क्रमांक ४ ः
सामान्य २३३, ॲनिमिया ११, उच्च रक्तदाब २१, मधुमेह १५, उच्च रक्तदाब व मधुमेह ५, इतर २१, पुढील तपासणीसाठी ५५