ज्ञानदीप राबविणार महिलांसाठी उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानदीप राबविणार महिलांसाठी उपक्रम
ज्ञानदीप राबविणार महिलांसाठी उपक्रम

ज्ञानदीप राबविणार महिलांसाठी उपक्रम

sakal_logo
By

53658
गडहिंग्लज : ज्ञानदीप प्रबोधिनीच्या वार्षिक सभेत बाबासाहेब आजरी यांचा सत्कार करताना एम. एल. चौगुले. शेजारी संदीप कागवाडे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. बी. एस. पाटील, प्रा. व्ही. के. मायदेव, महेश मजती.


ज्ञानदीप राबविणार
महिलांसाठी उपक्रम
सभेत निर्णय; स्थावर मालमत्ता खरेदीस मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील ज्ञानदीप प्रबोधिनीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. युवती व महिलांसाठी रोजगाराभिमुख विविध उपक्रम आणि सोईसुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच संस्थेच्या स्थावर मालमत्ता खरेदीस सभासदांनी मंजुरी दिली. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. रवळनाथ सोसायटीच्या सभागृहात ही सभा झाली.
चौगुले यांनी अहवाल वाचन केले. मागील वर्षभरातील उपक्रमांचा आढावा व भविष्यातील उपक्रमांचे विवेचन केले. खजिनदार महेश मजती यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सचिव संदीप कागवाडे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचला. सल्लागार आर. एस. निळपणकर यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले. ऐनवेळच्या विषयावरील चर्चेत महाविद्यालयीन विद्यार्थिनी, घरेलू मोलकरीण, गृहिणी आणि गृहोद्योगातील महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा झाली. त्याबाबत नियोजन व कार्यवाहीचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात आले. कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाटील, उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, प्रा. विजय आरबोळे, संजीवनी पाटील, डॉ. दीपा कुलकर्णी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मीना रिंगणे यांनी स्वागत केले. सहसचिव प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक नंदकुमार शेळके, सुभाष पाटील, संजय चौगुले, आप्पासाहेब आरबोळे, डॉ. आर. एस. निळपणकर, पांडुरंग शिंगटे, विजय आरबोळे यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते. अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य एस. एन. देसाई यांनी आभार मानले.

चौकट..
आजरी यांचा सत्कार...
निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी तीन लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते श्री. आजरी यांचा सत्कार करण्यात आला.