इचलकरंजीत विमा प्रतिनिधींची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत विमा प्रतिनिधींची निदर्शने
इचलकरंजीत विमा प्रतिनिधींची निदर्शने

इचलकरंजीत विमा प्रतिनिधींची निदर्शने

sakal_logo
By

53662

इचलकरंजीत विमा प्रतिनिधींची निदर्शने
इचलकरंजी, ता. ३० : पॉलिसीधारकांना बोनस वाढवा, विमा हप्त्यावरील जीएसटी मागे घ्या यासह विविध मागण्यांसाठी विमा प्रतिनिधींच्या लिआफी जॉईंट ऍक्शन कमिटी, ऑल इंडिया लिआफी संघटनेतर्फे येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) कार्यालयासमोर निदर्शने केली. निदर्शनामध्ये महिला प्रतिनिधींची संख्या लक्षणीय होती.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती संभाजी महाराज चौक येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयासमोर शुक्रवारी विमा प्रतिनिधींकडून निदर्शने केली. शहरात दोन्ही कार्यालयामधील सुमारे ९०० विमा प्रतिनिधींनी या एकदिवशीय निदर्शनामध्ये सहभाग नोंदवला. किरण कटके, राधेशाम लोया, शिवाजी शिंदे, सागर पाटील, अशोक गुलगुंजे, नितीन जवाहरे, प्रकाश पंजवाणी आदी सहभागी झाले होते.