पत्रके विविध पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके विविध पत्रके
पत्रके विविध पत्रके

पत्रके विविध पत्रके

sakal_logo
By

53702
कोल्हापूर : प्रा. डॉ. एम. ए. शिंदे यांच्या ग्रंथ प्रकाशनप्रसंगी मान्यवर.

डॉ. शिंदे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. एम. ए. शिंदे यांच्या ‘फायनानसियल मॅनेजमेंट ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज’, ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ या संशोधनपर संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते. डॉ. शिंदे यांनी पुस्तक लेखनापाठीमागील भूमिका विषद केली. प्रकाशक प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार केला. जायंट्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र ओबेरॉय, न्यू कॉलेजचे प्रा. डॉ. ए. जी सूर्यवंशी, चंद्रकांत लोहार, शहाजी नलवडे, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले उपस्थित होते. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी स्वागत केले. प्रा. एम. टी. धनवडे यांनी परिचय करून दिला. प्रा. पी. के पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
...
53707
कोल्हापूर : कर्णबधिर विद्यालयात विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस देताना दीपक घाटे.

कर्णबधिर विद्यालयात विविध कार्यक्रम
कोल्हापूर ः कर्णबधिर विद्यालयातर्फे जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त विविध स्पर्धांचे, कार्यक्रम झाले. यामध्ये क्रिडा, चित्रकला, संगोळी स्पर्धा, आरोग्य शिबिर, स्वच्छता मोहिम राबवली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. गणवेश वाटपही केले. प्रज्ञा उंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर जाधव यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक उदय राऊत यांनी आभार मानले.
...
धनदायी पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश
कोल्हापूर : धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गेल्या आर्थिक वर्षात बावीस लाखांपेक्षा अधिक नफा झाल्याने सभासदांना १५ टक्के लाभांश संस्थापक अॅड. शिवराम जोशी-मुडशिंगीकर, अध्यक्ष रामदास रेवणकर यांनी जाहीर केला. संस्थेने ११ कोटी ठेवींचे उद्दिष्ट पार केल्याबद्दल व्यवस्थापक संजय जमदग्नी, विवेक धाक्रस, रविंद्रनाथ नार्वेकर यांचा सत्कार केला. सभादांच्या पाल्यांचाही विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल सत्कार केला. ऑडिटर माधव अस्वले, अन्य ज्येष्ठ सभासदांचाही सत्कार केला. उपाध्यक्ष शेखर कुलकर्णी, संचालक अनिल चिकोडी, विलासराव पाटील, सम्राट बराले, लता कदम, अॅड. मीना पोवार, डॉ. मारूती भोई, प्रकाश संकपाळ, प्रा. पांडुरंग यज्ञोपवित, सभासद अॅड. राजवर्धन मुजुमदार, मदनसिंग पवार, विठ्ठल पाटकर, ॲड. समाधान पाटील, अॅड. संदिप घाटगे उपस्थित होते. श्री. कुलकर्णी यांनी आभार मानले.
...
न्यू कॉलेजमध्ये व्याख्यान
कोल्हापूर : डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्कार समारंभानिमित्त न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे व्याख्यान झाले. माजी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी म्हणाले, ‘‘डॉ. लवटे यांचे सामाजिक कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी, आजच्या तरूणांना आदर्शवत असून ‘खाली जमीन वर आकाश'' हे आत्मचरित्र विद्यार्थ्यांनी वाचावे.’’ प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. डी. ढमकले यांनी डॉ. लवटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. मराठी विभागाच्या प्रा. डॉ . मनीषा नायकवडी यांनी स्वागत केले. समृद्धी पताडे हिने सूत्रसंचालन केले. प्रा. ए. व्ही. पाटील यांनी आभार मानले.
...
डॉ. लोहिया पतसंस्थेतर्फे सभा
कोल्हापूर : डॉ. राममनोहर लोहिया पतसंस्थेच्या ३४ वी वार्षिक सभा झाली. पतसंस्थेचे संस्थापक व्यंकाप्पा भोसले यांचे भाषण झाले. प्रकाश वर्षे यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील भोसले यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक देवेंद्र भोसले यांनी अहवाल वाचन केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले. सभासद उपस्थित होते.
...
बुद्ध गार्डनमध्ये आज कार्यक्रम
कोल्हापूर : बुध्द गार्डन संवर्धन विकास सेवा संस्थेतर्फे शास्त्रीनगर येथील बुद्ध गार्डनमध्ये बुधवारी (ता. ५) बुध्दवंदना, धम्मदेसना, खिरदान, भोजनदान तसेच प्रबोधनात्मक भिमबुध्द गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत कार्यक्रम होतील. ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येईल. बौध्द उपासक, उपसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी पत्रकाद्वारे केले.