मानाचे पान भाग ६ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानाचे पान भाग ६
मानाचे पान भाग ६

मानाचे पान भाग ६

sakal_logo
By

मानाचे पान भाग - ६

फोटो -

नवरात्रोत्सवात मंदिरातील वातावरण वाद्ये वाजवून ते प्रसन्न

श्री तुळजाभवानीच्या मंदिरात
ढोलगं वादनातून येते प्रसन्नता

स्वप्नील, निखिल कदम कुटुंबीयांना मानाचा अभिमान
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात ताशा व ढोलगं वाजायला लागते. वातावरणात अचानक उत्साह संचारतो. भाविक श्रद्धापूर्वक देवीचे दर्शन घेताना, या वाद्यांचे वाजंत्री कोण, असा साहजिक प्रश्‍न पडतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दोन तरुण समोर येतात. एकाचे नाव स्वप्नील, तर दुसरा निखिल. दोघेही सख्खे भाऊ. कदम कुटुंबीयांकडे असलेला वाजंत्रीचा मान ते आजही टिकवून आहेत.
कदम कुटुंबातील दशरथ कदम छत्रपती राजाराम महाराज यांच्या सेवेत होते. वाजंत्री म्हणून ते ताशा व ढोलगं वाजवायचे. त्यांच्या मृत्यूनंतर ते काम अनंत कदम यांच्याकडे आले. तुतारीवादक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्याचबरोबर छत्रपती घराण्यात साजऱ्या होणाऱ्या विविध सणांसह कार्यक्रमात त्यांना ढोलगं वाजविण्याचे काम होते. नवरात्रोत्सवात मंदिरातील वातावरण वाद्ये वाजवून ते प्रसन्न करायचे. ताशा व ढोलगं वाजविण्याची कला ही वेगळी आहे. ती त्यांनी रोजच्या सरावातून आत्मसात केली होती. त्यांचा मुलगा स्वप्नील व निखिल यांनी वडिलांकडून ही कला शिकून घेतली. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांना वादनाचा मान मिळाला.
नवरात्रोत्सवात दोघेही मंदिरात वेळेवर हजेरी लावून वादनाची सेवा बजावतात. विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीची पालखी विविध ठिकाणी भेटीसाठी बाहेर पडते. त्या पालखीससोबत त्यांचा ताशा व ढोलग्याचा ठेका ऐकायला मिळतो. तो एका विशिष्ट लयीत वाजविला जात असल्याने, पालखी आल्याची वर्दी आपोआपच त्या परिसरातील भाविकांना मिळते.
स्वप्नील व निखिल यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. छत्रपती घराण्याकडून मिळालेल्या मानाचा त्यांना अभिमान आहे. उदहरनिर्वाहासाठी ते बँड पथकात वाद्य वाजविण्याचे काम करतात. कोणतेही वाद्य वाजविण्यात ते कमी नाहीत. नवरात्रोत्सवात विविध ठिकाणच्या सुपाऱ्या बँड पथकाला मिळत असल्या तरी ते पथकात वाद्य वाजविण्यास नकार देऊन देवीच्या सेवेत दंग होतात. डोक्यावर फेटा, पांढरी पँट व शर्ट परिधान करून ते पालखीबरोबर अनवानी शहरात फिरतात.

कोट -
श्री तुळजाभवानी देवी छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आहे. या देवीसमोर नतमस्तक होताना मनाला समाधान मिळते. नवरात्रोत्सवात तर आम्ही मंदिरात कधी एकदा जातो, असे होते. देवीच्या सेवेतून आम्हाला मोठा आनंद मिळतो.
- स्वप्नील कदम