केएमटी संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी संप
केएमटी संप

केएमटी संप

sakal_logo
By

केएमटी कर्मचाऱ्यांचा
मागण्यांसाठी संपाचा इशारा
कोल्हापूर, ता. ३० ः प्रलंबित मागण्यांबाबत अधिकृत संघटनेच्या प्रतिनिधींना सात दिवसात चर्चेला बोलवावे. अन्यथा नोटीस देऊन बेमुदत संप केला जाईल, असा इशारा म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने पत्राद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम पदावर नियुक्त करावे. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मंजूर करून फरकाचा पगारात समावेश करावा. शासनाने जाहीर केलेल्या महागाई भत्ता द्यावा. कोरोना काळात पगारातील २५ टक्के रक्कम कपात केली होती. त्याचे सात हप्ते कपात झाले होते. चार हप्ते मिळाले आहेत. उरलेले तीन हप्ते दिवाळीपूर्वी देण्यात यावेत. रोजंदारी लोकांना दहा हजारांची तसलमात देण्यात यावी. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सात महिने बारा हजाराऐवजी दहा हजार पगार दिला. त्यांना तहसलमात न देता सात महिन्यांचा फरक द्यावा. कर्मचाऱ्यांचे पगार दहा किंवा १५ तारखेच्या आत आदा करावेत. प्रभारी म्हणून काम करणाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. केएमटी उत्पन्नात वाढ करायची असल्यास दैनंदिन पास ४० ऐवजी ५० रूपये करावा. यंदा खाकी ड्रेसचे कापड त्वरीत द्यावे. रोजंदारी लोकांनाही एक ड्रेसचे कापड द्यावे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समावेश केल्यास दैनंदिन चालक वाहकांअभावी बंद पडणारे शेड्युल सुरू राहील. बसेस संख्या वाढवावी. वेळापत्रकात ताबडतोब बदल करावा. कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले पुन्हा सुरू करावीत. कोरोना काळामुळे कामगार तीन वर्षे दिपावली साजरी करू शकलेले नाहीत.