‘आलमट्टी’ची उंची वाढविणे हेच लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आलमट्टी’ची उंची 
वाढविणे हेच लक्ष्य
‘आलमट्टी’ची उंची वाढविणे हेच लक्ष्य

‘आलमट्टी’ची उंची वाढविणे हेच लक्ष्य

sakal_logo
By

५३६५५
आलमट्टी ः येथे कृष्णा नदीचे गंगापूजन करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई. शेजारी पाटबंधारे मंत्री गोविंद कार्जोळ, खासदार रमेश जिगजिणगी यांच्यासह मान्यवर व अधिकारी.

‘आलमट्टी’ची उंची
वाढविणे हेच लक्ष्य
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
आलमट्टी / मांजरी, ता. ३० ः आलमट्टी जलाशयाची उंची ५१९ वरून ५२४ फुटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने आम्ही आधीच बरीच पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज येथे स्पष्ट केले. श्री. बोम्मई यांनी आलमट्टी येथील लालबहादूर शास्त्री जलाशयात उत्तर कर्नाटकाची जीवदायिनी कृष्णा नदीला ओटी अर्पण करीत पूजन केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘कृष्णा नदीचे पाणलोट क्षेत्र, संपूर्ण कोकण प्रदेश व कृष्णेला मिळणाऱ्या उपनद्यांच्या क्षेत्रात या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्व नद्या दुथडी वाहत असून कर्नाटकातील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने राज्यातील ८० टक्के तलाव, बंधारे भरले आहेत. भूगर्भातील पाणी पातळीही वाढली आहे. या वेळी आलमट्टी जलाशयही महिनाभरापासून तुडुंब भरला आहे. जलाशयात ५१९ फूट उंचीपर्यंत पाणी आहे, हे पाहून आनंद होतो.’’ ते म्हणाले, ‘‘आलमट्टी जलाशयाची उंची ५२४ फुटांपर्यंत वाढविण्यापूर्वी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. वीज केंद्र विस्तारीकरणसह आवश्यक ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे.’’ या वेळी पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, मुद्देबिहाळचे आमदार एस. एस. पाटील-नडहळ्ळी, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी आदी उपस्थित होते.