विमानतळ पोलिसांचा प्रामाणिकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ पोलिसांचा प्रामाणिकपणा
विमानतळ पोलिसांचा प्रामाणिकपणा

विमानतळ पोलिसांचा प्रामाणिकपणा

sakal_logo
By

53722

तेलंगणातील प्रवाशाला सोन्याचे
ब्रेसलेट प्रामाणिकपणे केले परत

विमानतळ पोलिसांचे कौतुक

कोल्हापूर ः अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी तेलंगणावरून आलेल्या प्रवासी महिलेचे हरवलेले सोन्याचे ब्रेसलेट विमानतळ पोलिसांनी शोधून तिला परत केले. तिने पोलिसांचे आभार मानून कौतुक केले.
नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी तेलंगणा येथील पोली मेनू अनुजा या येत होत्या. त्या आज दुपारी हैद्राबाद ते कोल्हापूर विमानाने कोल्हापुरात दाखल झाल्या. विमानातील सर्व प्रवासी निघून गेले. दरम्यान पोली मेनू अनुजा यांना त्यांचे ८० हजार रूपये किमंतीचे सोन्याचे ब्रेसलेट हरविल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती ट्रॅक्सी चालकाद्वारे विमानतळावरील सुरक्षा विभागाला कळवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक विलास भोसले यांच्यासह महिला पोलिस कर्मचारी नरके, जोत्सना पाटील, सारिका जाधव यांनी येथील आगमन हॉलचा शोध घेतला. तेथे त्यांना संबधित ब्रेसलेट मिळून आले. त्यांनी सदरचे ब्रेसलेट ओळख पटवून त्यांना परत केले.