कृष्मा नदी पाहणी - सांगली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्मा नदी पाहणी - सांगली
कृष्मा नदी पाहणी - सांगली

कृष्मा नदी पाहणी - सांगली

sakal_logo
By

फोटो - 53721
कृष्णा प्रदूषणाची
हरित लवादाच्या
समितीकडून पाहणी
सांगली, ता. ३० ः कृष्णेच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात हरित लवादाच्या समितीने आज ठिकठिकाणी पाहणी करीत पाण्याचे नमुने घेतले. या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून त्याचा सविस्तर अहवाल हरित लवादाला देण्यात येणार आहे.
कृष्णेत प्रदूषित आणि रसायनमिश्रीत पाणी सोडले जात असल्याने दरवर्षी लाखो मासे मृत होतात. त्याबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फडतरे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी लवादाने समिती नेमली आहे. त्या समितीने सांगलीतील शेरीनाला ते रेठरे हरणाक्षपर्यंत नदीची पाहणी करत पाण्याचे नमुने घेतले. हरित लवादाचे तज्ज्ञ निश्‍चल, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, मत्स्य विभागाच्या अमिता कोळेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, डॉ. रोहिदास मातकर, डॉ. गजानन खडकीकर, दिलीप देसाई यांच्या पथकाने पाहणी केली. नदीचे आरोग्य धोक्यात असून विविध गावे, शहरे, कारखाने यांच्याकडून सोडले जाणारे पाणी घातक असून त्यामुळेच लाखो माशांचा मृत्यू होत असल्याचा मुद्दा याचिकेत आहे. समितीने शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याची पाहणी केली. इस्लामपूर आणि आष्टा पालिकांचे सांडपाणी, फार्णेवाडी, वाळवा, नागठाणे येथील नाल्यांचे पाणी थेट नदीत मिसळते, त्याचीही पाहणी करण्यात आली. डिग्रज, बहे-बोरगाव येथेही पाण्याचे नमुने घेतले आहेत.