‘गोडसाखर’ च्या निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’ च्या निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू होणार
‘गोडसाखर’ च्या निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू होणार

‘गोडसाखर’ च्या निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू होणार

sakal_logo
By

‘गोडसाखर’ची रणधुमाळी
पुन्हा सुरू होणार
गडहिंग्लज, ता. ३० : जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीवरील स्थगिती राज्य सहकारी प्राधिकरणच्या सचिवांनी आज उठविली. यामुळे अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी पुन्हा सुरू होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया जुलैमध्ये सुरू झाली होती. ११ ते १५ जुलैअखेर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुदतीअखेर २२३ जणांनी २६३ अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशीच प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरअखेर स्थगिती दिली होती. आज ही स्थगिती उठवल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या प्रक्रियेपर्यंत येऊन निवडणूक थांबली होती, त्यापुढे पुन्हा प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे गोडसाखर निवडणुकीची प्रक्रिया आता छाननीपासून सुरू होणार आहे. छाननी, माघार, चिन्ह वाटप, मतदान आणि निकाल असा कार्यक्रम निवडणूक अधिकारी पुन्हा तयार करून तो प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविणार आहेत. त्याच्या मंजुरीनंतर तारखा स्पष्ट होणार आहेत.