नागठाणाच्या आरोपी सात दिवसाची पोलीस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागठाणाच्या आरोपी सात दिवसाची पोलीस कोठडी
नागठाणाच्या आरोपी सात दिवसाची पोलीस कोठडी

नागठाणाच्या आरोपी सात दिवसाची पोलीस कोठडी

sakal_logo
By

बेकायदा दारू विक्री; दोघांना अटक
गडहिंग्लज, : गडहिंग्लज शहर व तालुक्यातील निलजी येथे बेकायदा देशी-विदेशी दारू विक्रीप्रकरणी दोघांना अटक केली. आनंदा कृष्णा बागडी (निलजी) व संतोष नाना मांडे (उतूर, ता आजरा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दहा हजाराची दारू जप्त केली.
पोलिसांनी सांगितले की, निलजी येथे विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बागडी याच्याकडे ११९० रुपये किमतीचे १७ देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिस कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार यांनी ही सकाळी साडे दहाला कारवाई केली. त्यानंतर, शहरातील हनुमान मंदिराजवळ बस स्टॉपवर मांडे याला देशी-विदेशी दारू विक्री करताना पोलिस कॉन्स्टेबल देविदास धनवे यांनी पकडले. त्याच्याकडून ९ हजार २०० रुपये किमतीच्या ५४ देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. सकाळी साडे अकरा वाजता ही कारवाई केली.
-
कागलला एकास मारहाण
कागल : किरकोळ कारणावरून येथे एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून व पाठीत काठीने मारहाण करून एकास गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघा अल्पवयीन तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतची फिर्याद निहाल उमर शेख (२२, रा.मुजावर गल्ली, कागल) याने दिली. येथील राजपुरोहित बेकरीच्या बाजूला असलेल्या जैन मंदिर येथे रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
-