दिव्यांग दाखले पेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग दाखले पेच
दिव्यांग दाखले पेच

दिव्यांग दाखले पेच

sakal_logo
By

यूडीआयडी कार्ड वाटप शिक्षकांच्या माथी
समाजकल्याणचे वॉटसॲप आदेश : दिव्यांग कल्याण आयुक्त अनभिज्ञ, राज्यभर नाराजी
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : दिव्यांग व्यक्तींचे यूडीआयडी कार्ड वाटपाचे काम दिव्यांग शाळातील शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे राज्यभरातील दिव्यांग शाळा शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सहामाही परीक्षा काळात अध्यापनाचे काम सोडून दिव्यांग शाळा शिक्षकांनी यूडीआयडी कार्य वाटपासाठी गावभर फिरण्याची वेळ आली आहे, यातील विशेष असे की, दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना समाज कल्याण अधिकऱ्यांनी केवळ वॉटस्‌ॲप आदेशाद्वारे कार्ड वाटपाची सक्ती केली, असे आदेश पाळावेत कसे? असा प्रश्न शिक्षक विचारत आहे. याबाबत कास्‍ट्राईब दिव्यांग शिक्षक शिक्षकेतर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिव्यांगत्वाची तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत सर्वच जिल्ह्यात होते. दिव्यांगत्वाचे स्वरूप, टक्केवारी निश्चितीनंतर दिव्यांग व्यक्तींना यूडीआयडी कार्ड देण्यात येते. हे कार्ड बंगळूर येथील संस्थेत प्रिंट होऊन पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात येते. तेथून हे कार्ड पोस्टाद्वारे संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या घरी पोहचवले जाते, अशी कार्यपद्धती आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून राज्यातील बहुतेक समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दिव्यांग शाळा शिक्षकांना आदेश दिले. प्रत्येक शिक्षकाने आपापल्या तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे घर शोधून त्यांच्या घरी ही कार्ड द्यावीत, त्याचा फोटोही घ्यावा, असे लेखी पत्राद्वारे न देता वॉटॲप संदेशाद्वारे दिले. वॉटस्‌ॲप संदेश प्रमाण मानावा कसा? असा प्रश्न दिव्यांग शाळा शिक्षकांसमोर आहे. याबाबत काही शिक्षकांनी दिव्यांग आयुक्त कार्यालय (पुणे) यांच्याकडे विचारणा केली मात्र दिव्यांग आयुक्तांनी शिक्षकांनी कार्ड वाटावीत, असे आदेश दिलेले नाहीत असे सांगितले.

राज्यातील काही समाज कल्याण अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत दिव्यांग व्यक्ती ज्या गावातील आहेत. त्या गावातील ग्रामसेवकांनी यूडीआयडी कार्ड वाटप करावे, अशी सूचना केली. ग्रामसेवकांना गावातील दिव्यांग व्यक्ती माहिती असल्याने सहजपणे हे काम करता येणे शक्य झाले. मात्र काही समाज कल्याण अधिकारी दिव्यांग शिक्षकांनीच यूडीआयडी कार्ड वाटप करावे, यावर अद्यापि ठाम आहेत.

दिव्यांग शाळात सध्‍या सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू आहे. याच वेळी यूडीआयडी कार्ड वाटपाचे कारण सांगत शिक्षक अध्यापन सोडून शाळेतून दुपारीच बाहेर पडतात. त्यामुळे दिव्यांगांच्या अध्यापनाला फटका बसत आहे.

कोट
‘‘दिव्यांग शाळातील शिक्षकांनी यूडीआयडी कार्ड वाटपाचे तोंडी आदेश समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दिले. परिणामी जिल्ह्यातील दिव्यांग शाळातील अध्यापनाला खीळ बसत आहे. परीक्षाजवळ आल्याने अध्यापन व उजळणी सुरू असताना शिक्षकांना कार्ड वाटपात गुंतवले. त्यामुळे कास्‍ट्राईब शिक्षक संघटना या कामावर बहिष्कार घालणार आहे. हे आदेश मागे न घेतल्यास धरणे आंदोलन जिल्हावर करण्यात येतील.’’
तुषार भालेराव, कार्याध्यक्ष, कास्‍ट्राईब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना.

राज्यात एकूण शाळा १४००
दिव्यांग विद्यार्थी १ लाख
शिक्षक कर्मचारी १४ हजार