गबाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गबाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
गबाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

गबाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

sakal_logo
By

53818

‘दिव्यत्वाची जेथ प्रतीती’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर, ता. १ : : शिक्षक प्रदीप गबाले लिखित ‘दिव्यत्वाची जेथ प्रतीती’ पुस्तकाचे प्रकाशन युवराज संभाजीराजे छत्रपती, श्रीराम पचिंद्रे, ॲड. धनंजय पठाडे, विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांच्या हस्ते झाले.
संभाजीराजे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून शिक्षक त्यांच्यापरीने अभ्यास घेत असतात. आज परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे, चांगली पिढी घडणे गरजेचे आहे. अनेक शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांबद्दल माहिती असली पाहिजे. आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा इतिहास माहिती पाहिजे. यातून विद्यार्थ्यांची चांगली पिढी तयार व्हायला मदत होते.’’
श्री. पचिंद्रे म्हणाले, ‘‘प्रतीती याचा अर्थ साक्षात्कार. ज्या गुरुजनांच्या अध्यापनाने साक्षात्कार घडला, ते दिव्यत्व म्हणजे ‘दिव्यत्वाची जेथ प्रतीती’ होय. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून विद्यापीठ हायस्कूलची निर्मिती झाली. दीक्षित गुरूजी, तोफखाने गुरूजींच्या त्यागाने, अध्यापनाने अनेक विद्यार्थी घडले. ते मोठे झाले. त्या गुरुजनांबद्दल या पुस्तकातील व्यक्तीचित्रणे दिली आहेत.’’
ीश्री. गबाले म्हणाले, ‘‘शिष्यामुळेच गुरुचं महत्त्व वाढत जाते. भविष्यकाळातही हे महत्त्व वाढत राहो, अशी मी अपेक्षा करतो.’’ पी. एन. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. श्री. कुंभार यांनी आभार मानले.