जिप आरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिप आरक्षण
जिप आरक्षण

जिप आरक्षण

sakal_logo
By

जिल्हा परिषद फोटो

अध्यक्षपदासाठी २० महिला राहणार दावेदार
...................
सर्वसाधारण महिला प्रवर्ग ः पहिल्या अडीच वर्षांसाठी रस्सीखेच शक्य
......................
कोल्हापूर, ता. १ ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्‍चित झाले असून, कोल्हापूरचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक जुन्या ६७ गटांनुसारच होणार आहे. यापैकी ४० गट हे खुले असतील, यापैकी २० गटांवर सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण असेल. परिणामी या २० गटांतून विजयी होणाऱ्या महिला सदस्य अध्यक्षपदाच्या दावेदार राहणार आहेत. पहिल्या अडीच वर्षांसाठी हे आरक्षण असल्याने या पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्येच संपली आहे. तेव्हापासून संजयसिंह चव्हाण प्रशासक आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेचे ६७ गट होते, पण त्यात बदल करून ७६ गट केले होते. पाच वर्षांत नव्याने झालेल्या काही नगरपालिकांत जिल्हा परिषदेचे गट विलीन झाल्याने ही रचना केली होती. तथापि नवी रचना रद्द करून जुन्या गट-गण रचनेनुसारच या निवडणुका घेण्याचे निश्‍चित झाले आहे. अद्याप गट व गणांवरील आरक्षण निश्‍चित झालेले नाही. काही दिवसांत ही आरक्षण सोडत होईल, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. दिवाळीनंतरच ही निवडणूक होईल.
तत्पूर्वी राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांचे आरक्षण निश्‍चित केले. ठाणे, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत विद्यमान अध्यक्षांची मुदत संपल्यानंतर तर पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषदेत उर्वरित कालावधीसाठी हे आरक्षण असेल. याव्यतिरिक्त २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षांसाठीचे आरक्षणही शुक्रवार (ता. ३०) शासनाने निश्‍चित केले.
..........