मद्य तस्करांना मोका लावणार ः शंभूराजे देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मद्य तस्करांना मोका लावणार ः शंभूराजे देसाई
मद्य तस्करांना मोका लावणार ः शंभूराजे देसाई

मद्य तस्करांना मोका लावणार ः शंभूराजे देसाई

sakal_logo
By

मद्य तस्करांना मोका लावणार
मंत्री शंभूराज देसाई; प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे द्यावेत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमा कोल्हापूर जिल्ह्याला लागून आहेत. त्यामुळे मद्य तस्करीच्या अनेक घटना घडतात. उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांच्यावर कारवाईही केली जाते. यात जे तस्कर वारंवार आणि संघटितपणे मद्याची तस्करी करतात, त्यांच्यावर मोका कारवाई केली जाईल. अशांचे प्रस्ताव तयार करून ते येथील पोलिस अधीक्षकांकडे द्यावेत, अशा सूचना उत्पदन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री देसाई म्हणाले, ‘राज्यात गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होते. जे मद्य तस्कर वारंवार सापडतात. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली जाईल. यासाठी त्यांचे प्रस्ताव तयार करून ते पोलिस अधीक्षकांकडे पाठवले जातील. उत्पादन शुल्कने गेल्या वर्षी साडेसतरा हजार कोटींचा महसूल मिळवला होता. यावर्षी तो आणखी वाढवण्यासाठी योजना आणखी आली आहे.’

अस्थायी नाके उभारणार
मंत्री देसाई म्हणाले, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर गस्त घालून मद्य तस्करीवर कारवाई केली जाते. मात्र आता या महामार्गांना समांतर असणाऱ्या मार्गांवरही गस्त घातली जाणार आहे. तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी अस्थायी स्वरुपाचे तपासणी नाके उभारले जातील. त्यामुळे मद्य तस्करांवर जरब बसेल.

‘प्रायश्‍चित्त’ करावे लागले नाही
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांचे वागणे योग्य नाही, असे विधान केले आहे. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, ‘आमच्या आमदारांनी कोणतेही बेताल वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे आमच्यावर कधी प्रायश्‍चित्त करण्याची वेळ आलेली नाही.’ चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचा समाचार घेताना देसाई म्हणाले पुढच्यावेळी आमचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. मात्र, एकही कमी होणार नाही. खैरेंना उपचाराची गरज आहे.’
------------------------