अर्बन बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक
अर्बन बँक

अर्बन बँक

sakal_logo
By

अर्बन बँक भक्कम करणार
चळवळीतील कार्यकर्त्यांचा निर्धार ः निवडणुकीतही उतरणार
..............
कोल्हापूर, ता. १ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने आणि नामदार भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने बहुजनांच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या कोल्हापूर अर्बन बँकेला भक्कम करण्याचा निर्धार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बँकेच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. आठवड्यापूर्वी शतकोत्तरी अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत बँक हिताचे प्रश्न विचारणाऱ्या सभासदांना झुंडशाही पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न झाला. बँक हुकूमशाही पद्धतीने चालवून बँकेच्या सभेला गालबोट लावणाऱ्या आणि राजर्षी शाहू महाराज व भास्करराव जाधव यांच्या विचारांना तिलांजली दिली गेली. या प्रवृत्ती विरोधी आगामी बँक निवडणुकीत सामान्य सभासदांना न्याय देऊन पारंपरिक घराणेशाही वगळून नव्या उमेदीने बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत करणाऱ्या घटकांची सक्रिय राहण्याचा निर्धार या बैठकीत केला. बैठकीला चंद्रकांत यादव, कादर मलबारी, रफिक मुल्ला, गणी आजरेकर, विनोद डुणुंग, रमेश पोवार, भगवान काटे, सुभाष देसाई, बाबासाहेब देवकर, अंकुश कदम, महादेव पाटील आदी उपस्थित होते.