एज्युकेशनल पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशनल पत्रके
एज्युकेशनल पत्रके

एज्युकेशनल पत्रके

sakal_logo
By

कमला कॉलेजमध्ये चर्चासत्र
कोल्हापूर : कमला कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सेवा योजना व समाज परिवर्तन’ यावर चर्चासत्र झाले. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. डॉ. मुडेकर म्हणाल्या, ‘‘राष्ट्रीय सेवा योजनेतून आपल्याला समाज सेवा करण्याची संधी मिळते.’’ प्रा. विकास येसादे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल घस्ते, डॉ. सुजय पाटील यांनी संयोजन केले. प्रा. व्ही. टी. तराळ यांचे सहकार्य लाभले.
...


फोटो : 53885

बाबासाहेब काशीद जिल्हाध्यक्षपदी
कोल्हापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे जिल्हा अध्यक्षपदी बाबासाहेब काशीद, तर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मेघाताई जाधव यांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठे अनारसे यांनी कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. उपाध्यक्ष दिगंबर टिपुगडे, सुनील इंगळे, कोषाध्यक्ष अनिल संकपाळ, विभागीय सरचिटणीस दिनकर चव्हण, महिला आघाडी उपाध्यक्ष शुभा नावलगी, गीता बामणे, सचिव भाग्यश्री सूर्यवंशी, वैशाली फडतारे, सुरेखा गवळी यांची निवड झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीतील एम. आर. टिपुगडे, सयाजी झुंझार, मारुतीराव टिपुगडे, दिलीप अनार्थे, सोमनाथ साळोखे, विकस मदने, शांताराम राऊत, विष्णू वखरे उपस्थित होते.
...
विजय सोसायटीतर्फे १२ टक्के लाभांश
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील श्री विजय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्ष मुसा म्हमुलाल शेख, उपाध्यक्ष प्रभाकर मालेकर यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली.
...

इंदिरा गांधी विद्यानिकेतनकडून स्वच्छता
कोल्हापूर : इंदिरा गांधी विद्यानिकेतनकडून नवरात्र उत्सव आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त भवानी मंडप, जुना राजवाडा पोलिस ठाणे, श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता विद्यार्थी, शिक्षकांनी केली. मुख्याध्यापिका सौ. एम. आर. मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. के. एन. सुतार, आर. टी. गोरे, एस. जी. रणवरे उपस्थित होते.
...
मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिक दिन
कोल्हापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मातोश्री वृद्धाश्रम, चंबुखडी येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झाला. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, तालुका आरोग्याधिकारी फारुख देसाई, मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली राजशेखर, उपाध्यक्ष सूर्यप्रभा चिटणीस उपस्थित होते. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर झाले. ज्येष्ठांना गुलाब पुष्प, फळे वाटप करण्यात आली. तसेच ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्य निवडणूक आयुक्तांचे कृतज्ञापत्र दिले. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाने ज्येष्ठांसाठी व्हील चेअर, विनामूल्य वाहतूक सुविधा, रांगरहित मतदान अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच फॉर्म ‘१२ ड’ भरून ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येईल.’’