‘गोकुळ’ मधून मुरलीधर जाधव बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोकुळ’ मधून मुरलीधर जाधव बाहेर
‘गोकुळ’ मधून मुरलीधर जाधव बाहेर

‘गोकुळ’ मधून मुरलीधर जाधव बाहेर

sakal_logo
By

53924
मुरलीधर जाधव
०००००००००००००००
‘गोकुळ’च्या प्रतिनिधी पदावरून
मुरलीधर जाधव यांना हटविले
ठाकरे-शिंदे वादात कार्यकर्त्यांचा बळी

किंवा
‘गोकुळ’मधून मुरलीधर जाधव बाहेर
शासनाचे निवड रद्दचे आदेश; ठाकरे-शिंदे वादात कार्यकर्त्यांचा बळी

सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. १ ः शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या राजकारणाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. त्यातून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावरील (गोकुळ) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शासकीय प्रतिनिधी म्हणून असलेली निवड रद्द करण्यात आली. या संदर्भातील आदेश शुक्रवारीच (ता. ३०) ‘गोकुळ’ला प्राप्त झाले.
राज्यात २०१९ मध्ये राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्तांतर घडवताना ‘गोकुळ’वरील ३० वर्षांची माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता उलथवून टाकली. संघात २१ संचालकांसह दोन स्वीकृत व एका शासकीय प्रतिनिधींची संचालक म्हणून नियुक्ती केली जाते. स्वीकृत म्हणून युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची अलीकडेच नियुक्ती झाली आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांचा पराभव झाला; पण त्यांचे पुनर्वसन शासकीय प्रतिनिधी म्हणून करण्यात येणार होते. तत्पूर्वीच मुरलीधर जाधव यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या पदावर आपल्या निवडीचे थेट आदेशच आणले. निवड होऊनही त्यांना तीन महिने अधिकृत मान्यताच दिलेली नव्हती. संचालक मंडळाच्या बैठकीत जाधव यांच्या निवडीला मान्यता देऊन तसा ठराव शासनाला पाठवावा लागतो; पण ही प्रक्रिया लांबवण्यात आली. या विरोधात जाधव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मी कडवड हिंदू असल्यानेच श्री. मुश्रीफ आपल्याला संघात घेत नसल्याचा जाहीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काहीच हालचाल होत नाही, असे लक्षात येताच श्री. जाधव यांनी शिवसैनिकांसह संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र निदर्शने केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे श्री. जाधव यांच्या नावावर ठाम असल्याने मुश्रीफ व सतेज पाटील यांनी अलीकडेच जाधव यांच्या निवडीला अधिकृत मान्यता दिली होती.
जूनमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केले. त्यानंतर भाजपसोबत त्यांनी घरोबा केल्याने राज्यात शिंदे गट व भाजपची सत्ता आली. त्यानंतर यापूर्वीच्या सरकारने घेतलेले बहुंताशी निर्णय शिंदे-फडणवीस यांनी बदलले. दोन दिवसांपूर्वी संजय गांधी निराधार योजनेकडील निवडी रद्द ठरवल्यानंतर काल श्री. जाधव यांची ‘गोकुळ’मधील निवड रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले.
यासंदर्भात ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजारा दिला. श्री. जाधव यांची संघावरील निवड रद्द झाल्याचे आदेश कालच (ता. ३०) संघाला प्राप्त झाल्याचे श्री. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शिंदे समर्थकांना संधी
‘गोकुळ’वरील श्री. जाधव यांची निवड रद्द झाल्यानंतर या पदावर आता मुख्यमंत्री शिंदे समर्थकांची वर्णी लागणार आहे. खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटासोबत आहेत. त्यातून प्रा. मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र किंवा क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.