गड-डॉ. पाटणकर कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-डॉ. पाटणकर कार्यक्रम
गड-डॉ. पाटणकर कार्यक्रम

गड-डॉ. पाटणकर कार्यक्रम

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad13.jpg
गडहिंग्लज : पुरोगामी व समविचारी समाज बांधवांतर्फे झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. भारत पाटणकर. व्यासपीठावर हुमायून मुरसल.

समानतेच्या स्वप्नाआड येणारी
हुकुमशाही आडवी करायला हवी
डॉ. भारत पाटणकर : गंगाजमनी मोहब्बतपुरा संकल्प परिषद अंतर्गत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : शोषणमुक्त समाजाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढा लढला गेला. खरेच हे स्वप्न सत्यात आले का, हा प्रश्‍न आहे. मूळ समस्यांना बगल देऊन आता नवा देश घडविण्याचे स्वप्न आपल्यासमोर ठेवले जात आहे. मात्र, आपण समृद्धी असणाऱ्या, विषमता नसणाऱ्या, धर्म-जाती भेद नसेल, अशा समाजाचे स्वप्न पाहिले पाहिजे. या स्वप्नाआड येणाऱ्या देशातील हुकुमशाही आडवी करायला हवी, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
कोल्हापुरात होणाऱ्या गंगाजमनी मोहब्बतपुरा संकल्प परिषदेच्या पार्श्वभूमीवर येथील पुरोगामी व समविचारी समाज बांधवांतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉ. भारत पाटणकर बोलत होते. हिंदी है हम हिंदोस्ता हमाराचे प्रमुख हुमायून मुरसल अध्यक्षस्थानी होते. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘स्वातंत्र्य चळवळ हे सुवर्णयुग होते. आज इतिहास बदलण्याची गरज का वाटते?’
श्री. मुरसल म्हणाले, ‘आरोग्य व शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण झाले आहे. समाजाला नव्या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे.’ प्रा. आशपाक मकानदार यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. अरविंद बारदेस्कर, अशोक मोहिते, रमजान अत्तार यांचा विशेष सत्कार झाला. संतोष चिक्कोडे, प्रकाश कारवालो, सिद्धार्थ बन्ने, हरुण सय्यद, पी. एस. नदाफ आदी उपस्थित होते. प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.

चौकट...
भीतीचे राजकारण...
हुमायून मुरसल म्हणाले, ‘लोकशाहीत आता आपण जिथे पोहोचलोय हेच स्वातंत्र्याला अपेक्षित होते का, याचा विचार करायला हवा. ब्रिटिशांनी केले नाहीत असे कायदे केले जात आहेत. सारी बजबजपुरी झाली आहे. भीतीचे राजकारण केले जात आहे. आपली स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे वाटचाल सुरू आहे.’