आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवचंडी होमास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवचंडी होमास प्रारंभ
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवचंडी होमास प्रारंभ

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवचंडी होमास प्रारंभ

sakal_logo
By

फोटो ५३८८६

कोल्हापूर ः ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने सायंकाळी सुदर्शन होम व वास्तू होम घालण्यात आला.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या नवचंडी होमाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शारदीय नवरात्रोत्सवातील नवचंडी होमाचा आजपासून प्रारंभ झाला. आयर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये झालेल्या या होमाचा स्वामी प्रबुद्धानंद यांच्या सान्निध्यात सुरवात झाली. पहिल्या दिवशी सकाळी महागणपती होम, श्री नवग्रह होम करण्यात आला. श्रीगणपती होम जीवनातील अडथळे दूर करून प्रगती व यशप्राप्तीसाठी केला जात असल्याचे स्वामी प्रबुद्धानंद यांनी सांगितले. दरम्यान, श्री नवग्रह होम झाला. नकारात्मक प्रभाव कमी करून सकारात्मक प्रभाव वृद्धिंगत करण्यासाठी हा होम घालण्यात आला. शहरासह आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी होमादरम्यान गहन ध्यानाचा अनुभव घेतला. सायंकाळी सुदर्शन होम व वास्तू होम करण्यात आला. यावेळी राजश्री पाटील, डिंपल गजवानी, दिव्या चंदवानी उपस्थित होत्या.