गाढव चोरणाऱ्या टोळीला पाठलाग करून पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाढव चोरणाऱ्या टोळीला 
पाठलाग करून पकडले
गाढव चोरणाऱ्या टोळीला पाठलाग करून पकडले

गाढव चोरणाऱ्या टोळीला पाठलाग करून पकडले

sakal_logo
By

गाढव चोरणाऱ्या टोळीला
पाठलाग करून पकडले
सांगलीत प्रकार; नागरिकांकडून चौघांना चोप

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १ ः शहरामध्ये आता घरफोडी, चोरीसह गाढव चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील एक टोळी शहरातील दीड लाख रुपये किमतीची गाढवे चोरून नेत असताना त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या गाढव मालकांनी चौघांना चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी अंकुश ऊर्फ पिंटू सुरेश माने (वय ३५, रा. गावभाग) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. रमेश परशु बजंत्री, संगाप्पा ऊर्फ काळू यमनाप्पा बजंत्री, बाळाप्पा यमनाप्पा बजंत्री आणि वाहन मालक लक्ष्मण राम स्वामी गानंगेळ (सर्व रा. तेरदाळ, बागलकोट, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.
शहरात गाढव चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. कर्नाटकातून येऊन टोळी भटकी गाढवे चोरून ती परराज्यात विक्री करत असल्याची माहिती आहे. गाढव चोरीमागे मोठे रॅकेट असल्याचा आरोप गाढव मालकांचा आहे. शुक्रवारी दुपारी तेरदाळमधील चौघेजण एक ट्रक घेऊन कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलजवळ आले. तेथे पिंटू माने यांच्या मालकीची नऊ गाढवे भटकत होती. टोळी नऊही गाढवे ट्रकमध्ये घालून चोरून घेऊन जात होते. त्याची किंमत एक लाख ३० हजार रुपये आहे. हा प्रकार एकाने पहिला आणि पिंटू माने यांना कळविले. माने यांनी साथीदारांसह तेथे धाव घेतली. त्यावेळी चोरटे पळून जात होते. सर्वांनी त्यांचा पाठलाग करून फळ मार्केटच्या पुढे असणाऱ्या एका हॉटेलजवळ ट्रक अडविला. टोळीकडे गाढवांबाबत विचारात ते बोलत नव्हते. संतप्त जमावाने त्यांना चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.