कदम खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदम खुलासा
कदम खुलासा

कदम खुलासा

sakal_logo
By

सभासद नसल्याचे दाखवा,
राजकारण सोडतो; सुनील कदम

कोल्हापूर ः राजाराम साखर कारखान्याचा मी सभासद नाही, असे कोण म्हणतंय, सभासद नसल्याचे सिद्ध करा, मी राजकारण सोडतो, असे प्रत्युत्तर माजी महापौर सुनील कदम यांनी दिले आहे. चंभूभर दूध न घालणारे संघाच्या सभेच्या पाळण्याची दोरी हलवतात, मी तर उत्पादक सभासद आणि माजी महापौर या नात्याने व्यासपीठावर, असे स्पष्ट करत कदम यांनी विरोधकांवर टीकास्त्र केले. ‘राजाराम’च्या सभेत मी व्यासपीठावर होतो, या बाबीचा बागुलबुवा करणाऱ्या तथाकथित नेत्यांनी मी कारखान्याचा सभासद नसल्याचे सिद्ध करावे. गेली पंचवीस वर्षे याबाबत अवाक्षर न काढणारे ‘ते’ दोन नेते समर्थकांना लढायला लावून स्वतः कोठे लपून बसले होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.