वास्तु प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वास्तु प्रतिक्रिया
वास्तु प्रतिक्रिया

वास्तु प्रतिक्रिया

sakal_logo
By

आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी
‘सकाळ वास्तू’ला ग्राहकांचा प्रतिसाद
कोल्हापूर, ता. १ ः सकाळ माध्यम समूहाच्या वतीने भरवण्यात आलेल्या ‘सकाळ वास्तू’ प्रदर्शनात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया या प्रदर्शनात स्टॉल घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी दिल्या. सोमवारपर्यंत (ता. ३) चालणाऱ्या प्रदर्शनाला ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी भेट द्यावी, असे आवाहनही या व्यावसायिकांनी केले. या प्रदर्शनात स्टॉल घेतलेल्यांच्या काही प्रतिक्रिया अशा...

चौकट
नागाळा पार्कमध्ये महावीर कॉलेज परिसरात डी. के. एमराल्ड या प्रोजेक्टमध्ये टू, थ्री व फोर बीएचके लक्झरियस फ्लॅटस्‌ आम्ही उपलब्ध केले आहेत. ज्यामध्ये सोसायटी हॉल, लॉन अशा सुविधाही दिल्या आहेत. हा प्रोजेक्ट रेरामध्ये नोंदणीकृत असून आता नोंदणी केल्यास डिसेंबरपर्यंत पझेशन मिळेल. त्याचप्रमाणे भक्तिपूजानगरमधील ‘ग्रीन एमराल्ड’ या प्रकल्पामध्ये व्यापारी व निवासी फ्लॅटस्‌ आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, अशा प्रकारच्या बजेटमधील दरात फ्लॅट घेण्याची संधी दवडू नका.
- मदन अथणे, श्री मधुपुरी कन्स्ट्रक्शन

‘सकाळ’ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. शांतिनिकेतन समोर एसीई अव्हेन्यू या प्रकल्पामध्ये लक्झरियस व्यापारी संकुल व निवासी संकुल, तर कदमवाडी येथे निवारा या प्रकल्पामध्ये फ्लॅटस्‌ आकाराला येत आहेत. जे २०२४ पर्यंत पूर्णत्वास येतील. फुलेवाडी येथेही टूबीएचके फ्लॅटस्‌ आम्ही उपलब्ध केले आहेत. या प्रदर्शनात बुकिंग केल्यास जीएसटीमध्ये सूट देणार आहोत.
- विजय माणगावकर, निवारा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, एसीई इन्फ्रा

कोल्हापूरच्या लोकांना कोकण नेहमीच खुणावते. १५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तारकर्ली येथे समुद्रापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर पंचतारांकित अमेनिटीज असलेले फ्लॅटस्‌ आम्ही ग्राहकांसाठी तयार ठेवले आहेत. हे फ्लॅटस्‌ अगदी बजेटमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे कोल्हापुरातील लोकांना कोकणात एक उत्पन्नाचे साधनही निर्माण होऊ शकेल. वन, टू व थ्री बीएचके फ्लॅटस्‌ असल्याने दगदगीच्या दिवसांमध्ये निवांत होण्यासाठी हा एक पर्याय म्हणून निश्चितच समोर असेल.
- सिद्धेश हेंद्रे, मेट्रिक होम्स प्रायव्हेट लिमिटेड

देवकर पाणंद येथे ‘सफायर्स स्काय’ हा १३ मजली भव्यदिव्य प्रकल्प आकाराला येतो आहे. यामध्ये जिम, स्विमिंग पूल अशा अमेटीज उपलब्ध करून दिल्या आहेत. टू व थ्री बीएचके फ्लॅटचे गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य यामुळे हा प्रकल्प ग्राहकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल. येत्या दीड वर्षात या घरांचे पझेशन ग्राहकांना घेता येईल. रूईकर कॉलनी येथील सफायर्स पार्क हा अशाच पद्धतीचा प्रकल्प आहे.
- आर्येश संकपाळ, एस. एस. बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स

‘सकाळ’ नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो. वास्तू प्रदर्शनाचीही सध्या गरज होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच गेल्या तीन - चार महिन्यांत प्रॉपर्टी क्षेत्र तेजीत आहे. याचवेळी हे प्रदर्शन घेतल्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांचाही फायदा होईल. प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद आहे. पाचगाव - गिरगाव रोडवर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला मोठा ३० एकर परिसरातील मेट्रोलाईफ सिटी हा प्रकल्प नियोजित आहे. ५० हून अधिक अमेनिटीज येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. पुणे - मुंबईच्या धर्तीवर कोल्हापुरात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रकल्प होणार आहे.
- संदीप भंडारी, मेट्रोलाईफ सिटी


कारंडे मळा येथे देशपांडे इन्फ्राचे ॲड्रेस ८१७ व अव्हेन्यू असे दोन मोठे प्रकल्प आहेत. ॲड्रेस ८१७ मध्ये थ्रीबीएचकेचे १४ लक्झरियस फ्लॅट आहेत. तर अव्हेन्यूमध्ये सात फ्लॅटस्‌ आहेत. तसेच ताराबाई पार्क येथे किरण बंगल्याजवळ पार्क साईड हा व्यावसायिक आणि निवासी असे ६० युनिटस्‌साठी आकाराला येतो आहे. विविध प्रकारच्या अमेनिटीज येथे आम्ही फ्लॅटधारकांना देतो आहोत. ताराबाई पार्क या परिसरात थ्री बीएचके, फोर बीएचके प्रोजक्ट आहेत. सकाळच्या वास्तू प्रदर्शनात बुकिंग केल्यास प्रति चौरस फुटाला तीनशे रुपयांची सूट देत आहोत.
- अमोल देशपांडे, देशपांडे इन्फ्रा


नावाजलेले ब्रॅण्ड या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. येथे लोकांना विविध प्रोजेक्ट एकाच छताखाली पाहता येत आहेत. १७ लाखांपासून ते ३५ लाखांपर्यंतच्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. सर्वच स्तरांतील लोकांना येथे घर खरेदी करण्याची संधी आहे. शासकीय, खासगी तसेच छोट्या बँकांकडून आम्ही कर्ज पुरवठा करतो. ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागू नये, यासाठी आमच्या कार्यालयातूनच प्रॉपर्टीच्या खरेदीच्या सर्व सुविधा देतो. आता आयडियल कॉलनीमध्ये ४०० हून फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. सध्या आयडियल कॉलनीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे.
- अतुल पवार, आयडियल कन्स्ट्रक्शन


हॉकी स्टेडियमजवळ गृहलक्ष्मी या आमच्या प्रकल्पात १२० सदनिका आहेत. गार्डन, जिम, सोसायटी कार्यालय, सोसायटी हॉल, इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलर चार्जिंग सिस्टीम, अशा विविध सुविधा प्रकल्पांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच या प्रकल्पात बुकिंग करणाऱ्या ग्राहकांच्या गृहकर्जाचे दोन वर्षांचे व्याज आम्ही भरणार आहे. यामुळे नवीन घर घेणाऱ्या अनेक ग्राहकांना बराच फायदा होतो आहे.
- अभिजित गायकवाड, बटू बिल्डर्स