आजरा महाविद्यालयात शनिवारी कॅंम्पस इंटरव्ह्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा महाविद्यालयात शनिवारी कॅंम्पस इंटरव्ह्यु
आजरा महाविद्यालयात शनिवारी कॅंम्पस इंटरव्ह्यु

आजरा महाविद्यालयात शनिवारी कॅंम्पस इंटरव्ह्यु

sakal_logo
By

आजरा महाविद्यालयात
शनिवारी कॅम्पस इंटरव्ह्यू
आजरा : येथील आजरा महाविद्यालयात आयसीआयसीआय बॅंकेतर्फे रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी शनिवारी (ता. ८) मुलाखतीचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता या मुलाखती होतील. या जागेसाठी वयोमर्यादा २६ वर्षांच्या आतील व कोणत्याही शाखेतील पदवीधर, दहावी व बारावी आणि पदवी परीक्षेला ५० टक्क्यांच्या वर गुण असणे आवश्यक आहेत. मुलाखतीचा लाभ परिसरातील विद्यार्थांनी घ्यावा व मुलाखतीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. विनायक आजगेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. आजगेकर, प्रा. रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क करावा.